शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ब्राझीलला कोव्हॅक्सिन लस प्रकरणी चुकीचे काही नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 09:19 IST

भारत बायोटेकने केली भूमिका स्पष्ट

ठळक मुद्दे“चार जून रोजी ईयूए प्राप्त झाले. २९ जूनपर्यंत भारत बायोटेकला कोणतेही आगाऊ पैसे (ॲडव्हान्स पेमेंटस) मिळाले नाही की ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाला कोणत्याही लसींचा पुरवठा झालेला नाही.

नवी दिल्ली : ब्राझीलमध्ये ३२४ दशलक्ष डॉलर्सच्या कोव्हॅक्सिन लस मात्रांसाठीच्या कराराने मोठा वाद निर्माण झाला असून हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने त्यात काही चुकीचे असल्याचा ठामपणे इन्कार केला आहे. या करारात अनियमितता झाल्याच्या आरोपांमुळे तो आता निलंबित केला गेला आहे. भारत बायोटेकने निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही कंत्राटांकडे आणि ब्राझीलच्या नियमकांकडून मान्यतेसाठी क्रमाक्रमाने काम करण्याची पद्धत अवलंबिली होती.” ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाकडून कोव्हॅक्सिन मिळवण्याच्या नेमक्या विषयाबाबत पहिली बैठक नोव्हेंबर २०२० मध्ये झाल्यापासून २९ जूनपर्यंत कंत्राटे आणि नियामकांची मान्यता याबाबत आठ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रक्रियेत क्रमाक्रमाने काम केले गेले आहे.”

“चार जून रोजी ईयूए प्राप्त झाले. २९ जूनपर्यंत भारत बायोटेकला कोणतेही आगाऊ पैसे (ॲडव्हान्स पेमेंटस) मिळाले नाही की ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाला कोणत्याही लसींचा पुरवठा झालेला नाही. भारत बायोटेकने अशी क्रमाक्रमाने काम करण्याची पद्धत जगात अनेक देशांत कंत्राटांबाबत, नियामकांकडून मान्यतेसाठी आणि पुरवठ्यांसाठी अवलंबिली आहे. ” ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनॅरो हे याप्रकरणी वादात सापडले आहेत. तुलनात्मक जास्त किंमत, वेगाने झालेली बोलणी आणि नियामकांकडून प्रलंबित असलेली मान्यता ही कारणे दाखवून या व्यवहाराची चौकशी ब्राझीलच्या फेडरल प्रॉसिक्युटर्सनी सुरू केली आहे. 

गेल्या फेब्रुवारीमध्ये या करारावर स्वाक्षरी झाली.भारत बायोटेकने म्हटले आहे की, ब्राझील आणि इतर देशांत कोव्हॅक्सिन मिळवण्याच्या प्रक्रियेबद्दल प्रसारमाध्यमांत गेल्या काही आठवड्यांपासून येत असलेल्या बातम्या या ‘खोटे चित्र निर्माण करणाऱ्या’ आहेत.—————————-

टॅग्स :Brazilब्राझीलCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या