शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

बीएचयूमधील मुलींवर निर्बंध नाही; कपडे, मांसाहार हा त्यांचा निर्णय - प्रॉक्टरचा खुलासा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 2:28 AM

बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) पहिल्या नवनियुक्त प्रॉक्टर रोयोना सिंग यांनी विद्यार्थिनींना अमूक एका कपड्यांचे व मद्यपानाबद्दल बंधन नसेल; तसेच विद्यापीठाच्या खाणावळीत मांसाहारी भोजनालाही बंदी घातली जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले.

वाराणसी : बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) पहिल्या नवनियुक्त प्रॉक्टर रोयोना सिंग यांनी विद्यार्थिनींना अमूक एका कपड्यांचे व मद्यपानाबद्दल बंधन नसेल; तसेच विद्यापीठाच्या खाणावळीत मांसाहारी भोजनालाही बंदी घातली जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले.विद्यापीठाच्या १०१ वर्षांच्या इतिहासात हे पद प्रथमच महिलेला दिले गेले आहे. रोयोना यांचे नाव हे फ्रान्समधील एका गावावरून ठेवलेले आहे. त्या म्हणाल्या की, माझा जन्म युरोपमधील. मी नेहमी युरोप आणि कॅनडामध्ये प्रवास करते. मुलींवर कपड्यांचे बंधन घालणे म्हणजे मला स्वत:वर निर्बंध घातल्यासारखे वाटते.त्या म्हणाल्या की, अनेकदा तुमचा दिवस सकाळी ६ वाजता सुरू होऊन रात्री साडेदहाला संपतो. अशा परिस्थितीत तुम्हाला सोयीचे होतील, ते कपडे तुम्ही घालू शकत नसाल तर या युगात ते लाजिरवाणे आहे. मुलींना सोयीचे वाटत असलेले कपडे त्यांनी घातल्यावर मुलांनी आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही.‘तंग कपडे’ असे मुले म्हणतात त्या वेळी मला विचित्र वाटते, असे त्या म्हणाल्या. रोयोना सिंग या विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसमध्ये अ‍ॅनॉटॉमीच्या प्राध्यापक आहेत. भूतकाळात या विद्यापीठाने महिलांवर कोणतेही निर्बंध लादलेले नव्हते व आताहीतसे होणार नाही याचा त्यांनी पुनरुच्चार केला.विद्यार्थिनी सज्ञान आहेतमद्यपानाबद्दल बोलायचे तर येथील सगळ्या मुली या १८ वर्षांच्या वरील आहेत. तरीही त्यांनी काय करावे आणि काय करू नये, याचा आम्ही विचार करून, त्यांच्यावर निर्बंध का लादायचे, असा प्रश्न त्यांनी विचारला. माझ्या वैद्यकीय वसतिगृहापुरतेच मला माहीत आहे की बहुसंख्य मुलींनी पसंती दिली तर शाकाहारी अन्न दिले जाते. इतरांसाठी काही विशिष्ट दिवशी मासांहारी पदार्थ असतात, असे रोयोना सिंग म्हणाल्या.

टॅग्स :BHUबनारस हिंदू विश्वविद्यालयcollegeमहाविद्यालय