शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 04:55 IST

अनेक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचा निर्वाळा

नवी दिल्ली : ईव्हीएमशी फेरफार करण्याचे प्रयत्न झाल्याचा संशय विरोधी पक्षांनी व्यक्त केला असला तरी या यंत्रामध्ये कोणताही दोष नाही, ते हॅक होऊ शकत नाही असे आयएएस, आयपीएससह विविध स्तरावरील शासकीय अधिकाऱ्यांनी ठासून सांगितले आहे.

केरळ केडरचे आयएएस अधिकारी डॉ. दिनेश अरोरा यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, ईव्हीएम कार्यक्षम यंत्र आहे. याचा अनुभव तीनदा रिटर्निंग आॅफिसर म्हणून मी घेतला आहे. ईव्हीएममध्ये मतांची योग्य प्रकारे नोंदणी होते.

कर्नाटकमधील आयपीएस अधिकारी रुपा दिवाकर मुद्गिल यांनी म्हटले आहे की, ईव्हीएम हॅक करता येत नाही. ही गोष्ट सर्व आयएएस तसेच विविध राज्यांतील शासकीय अधिकाºयांना माहिती आहे. मतदान प्रक्रिया सुरू असताना हे सारे जण निवडणूक अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहात असतात. ईव्हीएमचे हॅकिंग शक्य असते तर त्या अधिकाºयांनी ही बाब पुराव्यासह वरिष्ठांसमोर नक्कीच उघड केली असती. तर रॉ या गुप्तचर संघटनेचे माजी प्रमुख विक्रम सूद यांनीही ईव्हीएमचे हॅकिंग होणे शक्य नाही, असे ठामपणे सांगितले आहे. २००९, २०१४, २०१८ सालच्या निवडणुकांत ईव्हीएमद्वारेच मतदान प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडली.निवडणूक आयोगाचे काम उत्तमतर आयएएस अधिकारी संजय दीक्षित म्हणाले की, गेली १५ वर्षे निवडणूक प्रक्रियेत जबाबदारी पार पाडल्यानंतर व चार लोकसभा निवडणुका जवळून बघितल्यानंतर एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते ती म्हणजे निवडणूक आयोग आपले काम उत्तमरित्या करत आहे. ईव्हीएमचे हॅकिंग अशक्य आहे. ईव्हीएमच्या कार्यप्रणालीत माणसांचा किती संबंध येतो यावर आयएएस अधिकारी एन. श्रावणकुमार यांनी दोन वर्षांपूर्वी लिहिलेला लेख पुन्हा टिष्ट्वटरवर शेअर केला आहे. ईव्हीएम संपूर्ण सुरक्षित यंत्र आहे, असे त्यात म्हटले आहे.