ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 04:55 AM2019-05-23T04:55:15+5:302019-05-23T04:55:17+5:30

अनेक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचा निर्वाळा

There is no possibility of EVM hacking | ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता नाही

ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता नाही

Next

नवी दिल्ली : ईव्हीएमशी फेरफार करण्याचे प्रयत्न झाल्याचा संशय विरोधी पक्षांनी व्यक्त केला असला तरी या यंत्रामध्ये कोणताही दोष नाही, ते हॅक होऊ शकत नाही असे आयएएस, आयपीएससह विविध स्तरावरील शासकीय अधिकाऱ्यांनी ठासून सांगितले आहे.


केरळ केडरचे आयएएस अधिकारी डॉ. दिनेश अरोरा यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, ईव्हीएम कार्यक्षम यंत्र आहे. याचा अनुभव तीनदा रिटर्निंग आॅफिसर म्हणून मी घेतला आहे. ईव्हीएममध्ये मतांची योग्य प्रकारे नोंदणी होते.


कर्नाटकमधील आयपीएस अधिकारी रुपा दिवाकर मुद्गिल यांनी म्हटले आहे की, ईव्हीएम हॅक करता येत नाही. ही गोष्ट सर्व आयएएस तसेच विविध राज्यांतील शासकीय अधिकाºयांना माहिती आहे. मतदान प्रक्रिया सुरू असताना हे सारे जण निवडणूक अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहात असतात. ईव्हीएमचे हॅकिंग शक्य असते तर त्या अधिकाºयांनी ही बाब पुराव्यासह वरिष्ठांसमोर नक्कीच उघड केली असती. तर रॉ या गुप्तचर संघटनेचे माजी प्रमुख विक्रम सूद यांनीही ईव्हीएमचे हॅकिंग होणे शक्य नाही, असे ठामपणे सांगितले आहे. २००९, २०१४, २०१८ सालच्या निवडणुकांत ईव्हीएमद्वारेच मतदान प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडली.

निवडणूक आयोगाचे काम उत्तम
तर आयएएस अधिकारी संजय दीक्षित म्हणाले की, गेली १५ वर्षे निवडणूक प्रक्रियेत जबाबदारी पार पाडल्यानंतर व चार लोकसभा निवडणुका जवळून बघितल्यानंतर एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते ती म्हणजे निवडणूक आयोग आपले काम उत्तमरित्या करत आहे. ईव्हीएमचे हॅकिंग अशक्य आहे. ईव्हीएमच्या कार्यप्रणालीत माणसांचा किती संबंध येतो यावर आयएएस अधिकारी एन. श्रावणकुमार यांनी दोन वर्षांपूर्वी लिहिलेला लेख पुन्हा टिष्ट्वटरवर शेअर केला आहे. ईव्हीएम संपूर्ण सुरक्षित यंत्र आहे, असे त्यात म्हटले आहे.

Web Title: There is no possibility of EVM hacking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.