शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभर फक्त बकवास करणाऱ्या दिग्विजय सिंहांना उत्तर देण्याची गरज नाही- बाबा रामदेव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 14:40 IST

ज्यांचं देशाकरता काही योगदान नाही, दिवसभर नुसते बकवास करत असतात त्यांच्याबाबत उत्तर देण्याची गरज नसल्याचं योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हंटलं आहे.

ठळक मुद्दे काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर टीका करताना भोंदू बाबांच्या यादीमध्ये रामदेव यांचं नाव नसल्यामुळे मी निराश झाल्याचं ट्विट केलं होतं. याबाबत बाबा रामदेव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांचं देशाकरता काही योगदान नाही, दिवसभर नुसते बकवास करत असतात त्यांच्याबाबत उत्तर देण्याची गरज नसल्याचं योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हंटलं आहे.

नागपूर, दि. 12- काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर टीका करताना भोंदू बाबांच्या यादीमध्ये रामदेव यांचं नाव नसल्यामुळे मी निराश झाल्याचं ट्विट केलं होतं. याबाबत बाबा रामदेव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांचं देशाकरता काही योगदान नाही, दिवसभर नुसते बकवास करत असतात त्यांच्याबाबत उत्तर देण्याची गरज नसल्याचं योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हंटलं आहे. तसंच बलात्कार प्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या राम रहिमबद्दलही रामदेव बाबा यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. बाबा राम रहिमवर झालेली कारवाई योग्यच आहे. जो बाबा चुकीचं काम करत असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. ‘पतंजली’च्या वितरकांच्या संमेलनासाठी ते नागपुरात आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राम रहिम सारख्या ढोंगी बाबांमुळे संस्कृतीचं नुकसान होतं. अशा व्यक्तींना कायद्याची भाषा समजावलीच पाहिजे, असंदेखील बाबा रामदेव म्हणाले. दरम्यान काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केलेल्या टीकेवर बाबा रामदेव यांनी प्रत्युत्तर दिलं. ज्यांचं देशाकरता काही योगदान नाही,  दिवसभर नुसते बकवास करत असतात त्यांच्याबाबत उत्तर देण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. आखाडा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या ढोंगी बाबांच्या यादीत योगगुरू रामदेव बाबांचे नाव नसल्याबाबत सवाल करत काँग्रेस नेते दिग्विजय  सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून रामदेव बाबांवर टीका केली होती. 

ढोंगी बाबांच्या यादीत रामदेव बाबांचं नाव नाही हे पाहून दुख: झालं - दिग्विजय सिंह भोंदू बाबांच्या यादीत योगगुरु बाबा रामदेव यांचं नाव नसल्याचं पाहून आपल्याला दुख: झाल्याचा टोला काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी लगावला आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर केली आहे. रविवारी अलाहाबादमध्ये आखाडा परिषदेची बैठक झाली. या बैठकीनंतर देशातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर करण्यात आली. अलाहाबादमध्ये सकाळी 11 वाजता ही बैठक झाली. बैठकीनंतर आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी महाराज यांनी धर्माच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करणा-या 14 ढोंगी बाबांची यादी जाहीर केली. यादीत आसाराम बापू, संत रामपाल आणि गुरमीत राम रहीमच्या नावाचा समावेश आहे. दिग्विजय सिंह यांनी यासंबंधी ट्विट करत लिहिलं आहे की, 'यादीत बाबा रामदेव यांचं नाव नाही हे पाहून आपण हताश झालो आहोत'. यावेळी दिग्विजय सिंह यांनी बाबा रामदेव बनावट वस्तू विकून फसवणूक करत असल्याचाही आरोप केला आहे. 'खोट्याला खरं सांगून बाबा रामदेव वस्तू विकत आहे', असं दिग्विजय सिंह बोलले आहेत.