शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रायच्या नियमावलीला मुदतवाढ नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 06:13 IST

४० टक्के ग्राहकांनी अर्ज भरून दिल्याचा दावा

- खलील गिरकर मुंबई : ट्रायच्या नवीन नियमावलीप्रमाणे ग्राहकांच्या आवडीच्या वाहिन्यांसाठी त्यांच्याकडून अर्ज भरून घेतले जात असून, उर्वरित ग्राहकदेखील लवकर अर्ज भरून देतील. ग्राहकांच्या सोयीसाठी वेबसाइट व इतर सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत देशातील ४० टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहकांनी आवडीच्या वाहिन्या पाहण्याचा अर्ज भरून दिला आहे. त्यामुळे कितीही मागणी झाली, तरी कोणत्याही परिस्थितीत या नियमावलीच्या अंमलबजावणीला मुदतवाढ मिळणार नसल्याचे ट्रायतर्फे स्पष्ट करण्यात आले. ट्रायचे सल्लागार अरविंद कुमार यांनी ही माहिती दिली.कुमार म्हणाले की, ग्राहकांना ३१ जानेवारीपूर्वी आपल्या आवडीच्या वाहिन्यांची यादी अर्ज भरून, केबल चालक व एमएसओकडे देण्याची गरज आहे, तरच त्यांच्या पे चॅनेलचे प्रसारण विनाव्यत्यय सुरू राहील. मात्र, ३१ जानेवारीपर्यंत जे ग्राहक अर्ज भरून देणार नाहीत, त्यांचे केबल प्रसारण बंद होणार नाही. त्यांच्या टीव्हीवर ब्लॅकआउट होणार नाही. १०० निशुल्क वाहिन्या त्यांना १३० रुपयांमध्ये पाहता येतील व त्यांच्याकडून तेवढीच रक्कम आकारली जाईल. मात्र, त्यांना पे चॅनेल पाहता येणार नाहीत. त्यामुळे आपल्या आवडीच्या वाहिन्या पाहण्यामध्ये कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी ग्राहकांनी वेळीच अर्ज भरून द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. ट्रायच्या नियमावलीला मुदतवाढ मिळणार असल्याची अफवा पसरविण्यात येत असून, ग्राहकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्राय