शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

युपीत गेल्या दोन वर्षांत एकही दंगल नाही - योगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 05:28 IST

आमच्या सरकारच्या दोन वर्षांच्या कारकीर्दीत एकही दंगल झाली नसल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. या राज्याची माफियाराज अशी असलेली प्रतिमा माझ्या सरकारने बदलली

लखनऊ : आमच्या सरकारच्या दोन वर्षांच्या कारकीर्दीत एकही दंगल झाली नसल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. या राज्याची माफियाराज अशी असलेली प्रतिमा माझ्या सरकारने बदलली असून राज्यातील कायदा, सुव्यवस्थेची उत्तम स्थिती ही इतरांसाठी आदर्श ठरली आहे असे ते मुलाखतीत म्हणाले.सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या कालावधीत केलेल्या कामांची माहिती देताना ते म्हणाले की, मी मार्च २०१७मध्ये सत्तासूत्रे स्वीकारण्याआधी उत्तर प्रदेशमध्ये कर्जाने दबलेले शेतकरी आत्महत्या करत होते. हे राज्य हत्या, लुटालूट व दंगली यांनी त्रस्त होते. सपा-बसपा यांच्या सरकारांच्या काळात राजकीय पाठबळ असल्याने माफिया सरकारी साधनांची लूट करत होते. त्यांनी अनेक घोटाळे केले. त्यामुळे कलंकित झालेली राज्याची प्रतिमा माझ्या सरकारच्या काळात सुधारली आहे.दावे व वास्तवात अंतर - प्रियांका गांधीउत्तर प्रदेशमधील आदित्यनाथ सरकारने राज्यातील परिस्थितीत सुधारणा करण्याचे जे दावे केले आहेत, त्यापेक्षा वास्तव वेगळे व भयानक आहे असा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी प्रयागराज ते वाराणसी या गंगायात्रेच्या दुसऱ्या दिवशी लोकांशी संवाद साधत होत्या.गेल्या ७0 वर्षांत या देशात काहीच प्रगती झाली नाही अशी शेखी मिरविण्याचे दिवस आता लवकरच संपणार आहेत, असा टोलाही प्रियांका गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांना लगावला.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक