शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

राफेलच्या किमतीवर आता चर्चा नाही, सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 16:23 IST

फ्रान्सच्या डेसॉल्ट कंपनीकडून घेण्यात येणाऱ्या ३६ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी प्रक्रियेची माहिती केंद्र सरकारनं सीलबंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती.

नवी दिल्ली-  फ्रान्सच्या डेसॉल्ट कंपनीकडून घेण्यात येणाऱ्या ३६ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी प्रक्रियेची माहिती केंद्र सरकारनं सीलबंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. त्यावर आज सुनावणी होत आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयानं राफेलच्या किमतीवर सार्वजनिकरीत्या चर्चा करण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राफेलच्या किमतीवर नव्हे, तर हवाई दलाला काय आवश्यक आहे, त्यावर चर्चा होऊ शकतेच. ज्यावेळी राफेलच्या विमानांच्या किमती सार्वजनिक केल्या जातील, तेव्हा या किमतीवर सार्वजनिक चर्चा होऊ शकते.सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी याचिकाकर्त्यानं या खंडपीठाकडे हे प्रकरण संवैधानिक पीठाकडे सोपवण्याची मागणी केली आहे. याचिकाकर्ते वकील एम. एल. शर्मा म्हणाले, सरकारकडून सोपवण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये मे 2015नंतर घेण्यात आलेल्या निर्णयांमध्ये काही गंभीर घोटाळे झाल्याचं समोर आलं आहे. पाच न्यायाधीशांचं खंडपीठानं या प्रकरणावर सुनावणी करावी, अशी याचिकाकर्त्याची मागणी आहे. आप नेते संजय सिंह यांच्या वकिलानं सांगितलं की, संसदेत 36 राफेल विमानांच्या किमतीचा खुलासा दोनदा करण्यात आला होता. त्यामुळे सरकारचा तर्कावर विश्वास ठेवू शकत नाही.भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या राफेल विमान करारावरून भारतात केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांनी आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडवला आहे. मात्र दुसरीकडे फ्रान्समध्ये भारताला देण्यात येणाऱ्या राफेल लढाऊ विमानांचा फर्स्ट लूक प्रसिद्ध करण्यात आला आहे.  राफेल लढाऊ विमानांची फ्रान्समधील इस्तरे ली ट्यूब हवाई तळावरील चित्रफित समोर आली आहे. राफेल विमाने हवाई दलाच्या ताफ्यात आल्यावर भारताच्या हवाई दलाची क्षमता वाढेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.  राफेल लढाऊ विमानांमध्ये असलेल्या अनेक वैशिष्ट्यांमुळे ही विमाने अन्य लढाऊ विमानांपेक्षा वेगळी ठरतात. दोन इंजिन असलेले हे विमान ताशी दोन हजार 130 किमी वेगाने उड्डाण करू शकते. तसेच या विमानांमधून अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा मारा करता येऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राफेल विमाने दूरच्या अंतरावरील लक्ष्यही सहजपणे भेदू शकतात. राफेल लढाऊ विमाने सुमारे 24 हजार 500 किलो वजन आपल्यासोबत वाहून नेण्यास सक्षम आहेत. तसेच अण्वस्त्र वाहून नेण्यातही सक्षम आहेत.

टॅग्स :Rafale Dealराफेल डील