शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या प्रतिष्ठेशी तडजोड नाही- राजनाथसिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 04:32 IST

भारत आता दुबळा राहिलेला नाही

नवी दिल्ली : चीनसोबतच्या पूर्व लडाख सीमेवर काहीसा तणाव निर्माण झाला असला तरी देशाच्या प्रतिष्ठेशी सरकार कदापि तडजोड करणार नाही, अशी ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी दिली व भारताची संरक्षण क्षमता वाढलेली असल्याने तो आता दुबळा राहिलेला नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.जम्मू-काश्मीरसाठी भाजपने आयोजित केलेल्या व्हिडिओ रॅलीमध्ये बोलताना राजनाथसिंह यांनी अशी खात्रीही दिली की, सीमेवरील परिस्थितीबाबत सरकार संसदेसह कोणालाही अंधारात ठेवणार नाही व योग्य वेळी सर्व माहिती दिली जाईल.संरक्षणमंत्री म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत देशाच्या प्रतिष्ठेशी तडजोड केली जाणार नाही, याची मी खात्री देतो. भारताचे संरक्षणसामर्थ्य आता खूप वाढले आहे; पण हे समार्थ्य कोणालाही भीती दाखविण्यासाठी नाही तर स्वसंरक्षणासाठी आहे. राजनाथसिंह यांनी असेही सांगितले की, भारतासोबतचा सीमातंटा चर्चेतून सोडविण्याची चीनची इच्छा आहे. भारताचेही तसेच मत आहे. त्यानुसार दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवर बोलणी सुरू आहेत.राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये असलेला विशेष दर्जा रद्द केल्याने जम्मू-काश्मीरच्या चहूमुखी विकासाचे पर्व सुरू झाले आहे.येत्या काही वर्षांत तेथे एवढा विकास होईल की, पाकव्याप्त काश्मीरमधील लोकही भारतात सामील होण्याची मागणी करू लागतील. तसे झाले की, पाकव्याप्त काश्मीरही भारताचा अविभाज्य भाग असल्याचा संसदेने केलेला नि:संदिग्ध ठराव सार्थक होईल.पाकच्या गोळीबारात जवान शहीद, दोघे जखमीश्रीनगर : पाकिस्तानच्या सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत जम्मू-काश्मीरच्या पूंछ या सीमेवरील जिल्ह्यात रविवारी सीमेपलीकडून केलेल्या गोळीबारात व तोफगोळ्यांच्या माऱ्यात एक भारतीय जवान शहीद झाला, तर इतर दोघे जखमी झाले.पूंछ जिल्ह्याच्या शाहपूर व केरनी या सीमेलगतच्या भागात पाकिस्तानने ही आगळीक करीत सैन्याच्या गस्ती चौक्यांवर तसेच गावांवरही मारा केला. सीमेवरील भारतीय सैन्यानेही यास जशास तसे चोख उत्तर दिले. या घटनेत जखमी झालेल्या तीन जवानांपैकी एकाचे नंतर इस्पितळात निधन झाले, असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. पाकिस्तानच्या अशा प्रकारच्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे या महिन्यात भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत.दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्याच्या उरी भागातही पाकिस्तानने अशीच आगळीक केल्याने तेथेही दोन्ही सैन्यांमध्ये सीमेवर रविवारी दुपारी परस्परांवर गोळीबार सुरू होता, असेही प्रवक्ता म्हणाला.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहchinaचीन