शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातला विरोध करणाऱ्यांना जागा नाही; अमित शाह यांचा मेधा पाटकरांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 16:33 IST

नर्मदा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या मेधा पाटकर यांना मागच्या दाराने गुजरातच्या राजकारणात उतरवण्यासाठी काही लोकांनी नवी सुरुवात केली आहे असं सांगत अमित शाह यांनी आपवर निशाणा साधला.

 सुरत - मुंबई दौऱ्यावर येण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (४ सप्टेंबर) गुजरात दौऱ्यावर असताना आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. काही लोक सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना मागच्या दाराने गुजरातच्या राजकारणात उतरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा शाह यांनी केला. मेधा पाटकर यांनी राज्याची जीवनवाहिनी असलेल्या नर्मदा प्रकल्पाला विरोध केला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत 'आप'ने नर्मदा बचाव आंदोलनाच्या संस्थापक सदस्य पाटकर यांना मुंबईच्या ईशान्य मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.

गृहमंत्री अमित शाह म्हणाले, नर्मदा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या मेधा पाटकर यांना मागच्या दाराने गुजरातच्या राजकारणात उतरवण्यासाठी काही लोकांनी नवी सुरुवात केली आहे. मला गुजरातच्या तरुणांना विचारायचंय, नर्मदा प्रकल्पाला तसेच गुजरातच्या विकासाला विरोध करणाऱ्यांना राज्यात येऊ देणार का?" असा सवाल त्यांनी विचारला. विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ३६व्या राष्ट्रीय खेळांच्या उद्घाटन समारंभात अमित शाह एका सभेला संबोधित करत होते.

गुजरातला विरोध करणाऱ्यांना जागा नाही"ज्यांना गुजरात आणि आपली जीवनवाहिनी नर्मदा प्रकल्पाला विरोध करणार्‍या मेधा पाटकरांना आणायचे आहे. ते प्रत्येक व्यासपीठावर गुजरातला बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाहीत, त्यांनी हे थांबवायला हवं. गुजरातचा विरोध करणाऱ्यांना कुठलीही जागा नाही. गुजरातच्या जनतेवर माझा विश्वास आहे राज्याला विरोध करणाऱ्यांना ते कदापि स्वीकारणार नाही असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. 

गेल्या २० वर्षांत गुजरातचा अनेक क्षेत्रात विकास मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये रस्ते आणि बंदरे यासारख्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आला आहे. २४ तास वीजपुरवठा दिला जात आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यात आला आहे. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुजरातने गेल्या २० वर्षात अनेक क्षेत्रांत विकास केला आहे आणि असे रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत जे कदाचित येत्या काही दशकात मोडता येणार नाहीत असंही अमित शाह म्हणाले. 

टॅग्स :Medha Patkarमेधा पाटकरAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदी