शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारशी संघर्ष करण्याचा विचार नाही; ओमर अब्दुल्ला यांचे घटक पक्ष काँग्रेसलाही स्पष्ट संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 13:48 IST

काश्मीरला त्वरित राज्याचा दर्जा त्वरित बहाल करणे, ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय मागे घेणे, अशा कृती मोदी सरकारकडून केल्या जातील, असे समजणे मूर्खपणाचे आहे, असे वक्तव्य ओमर अब्दुल्ला यांनी नुकतेच केले होते.

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आघाडीला विजय मिळाला. या आघाडीचे होऊ घातलेले मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला हे भाजपप्रणीत केंद्र सरकार, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल यांच्याशी संघर्ष करण्याच्या विचारात नाहीत. त्यांनी तसे संकेत आपला घटक पक्ष काँग्रेसलाही दिले आहेत.

काश्मीरला त्वरित राज्याचा दर्जा त्वरित बहाल करणे, ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय मागे घेणे, अशा कृती मोदी सरकारकडून केल्या जातील, असे समजणे मूर्खपणाचे आहे, असे वक्तव्य ओमर अब्दुल्ला यांनी नुकतेच केले होते. प्रचारात दिलेली आश्वासने येणाऱ्या सरकारकडून पूर्ण होणे शक्य नाही, याची कबुलीच त्यांनी या वक्तव्याद्वारे दिली असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. तसेच भाजपशी माझे सरकार संघर्ष करणार नाही, असे संकेत अब्दुल्ला यांनी या उद्गारांतून काँग्रेसला दिले आहेत.

राज्याचा दर्जा द्या- जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या ९० जागांकरिता झालेल्या निवडणुकांत काँग्रेस, अपक्ष, माकप, आपच्या आमदारांनी पाठिंबा दिला असून त्या बळावर नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत मिळाले आहे.- काश्मीरच्या विकासाकरिता आमचे सरकार केंद्राला सहकार्य करणार असल्याचे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले होते.- मात्र, जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्यात यावा, ही आपली मागणी यापुढेही मांडत राहणार असल्याचेही ते म्हणाले. 

छुप्या पाठिंब्याचे काय?विधानसभा निवडणुकांनंतर ओमर अब्दुल्ला यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल भाजपने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. भाजपला काश्मीर खोऱ्यामध्ये एकही जागा जिंकता आलेली नाही. भाजपला छुपा पाठिंबा दिल्याचा आरोप असल्याच्या गुलाम नबीआझाद, इंजिनिअर राशीद, जमात, अपक्ष यांच्यामुळे त्या पक्षाला जम्मू-काश्मीर निवडणुकांत काहीही फायदा झालेला नाही. 

भाजपने पाठराखण केलेल्यांना अपयशबंदी घातलेल्या जमातचा पुनर्प्रवेश, अभियंता राशीद यांच्या अवामी इत्तेहाद पक्षाचा उदय आणि गुलाम नबी आझाद यांच्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीच्या राजकीय हालचाली लक्षवेधी ठरल्या होत्या; पण राशीदचा भाऊ वगळता त्या व अन्य काही पक्षांचे नेते अपयशी ठरले. या सर्वांना भाजपचा पाठिंबा होता अशी चर्चा होती. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीर