शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 18:28 IST

'धर्म' या संकल्पनेचा उलगडा करताना भागवत म्हणाले, "धर्माकडे अनेक वेळा 'मजहब' म्हणून बघितले जाते. मात्र, धर्म म्हणजे, एखादा 'मजहब' नाही. धर्म म्हणजे सृष्टी ज्या नियमांनुसार चालते, त्याचे विज्ञान आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विज्ञान आणि धर्म यांच्यातील संबंधांसंदर्भात मोठे विधान केले आहे. विज्ञान आणि धर्म यांच्यात कोणताही संघर्ष नाही, दोन्ही वेगवेगळ्या मार्गांनी एकाच सत्याचा शोध घेतात, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ते शुक्रवारी तिरुपती येथे आयोजित 'भारतीय विज्ञान संमेलना'त बोलत होते.

'धर्म' या संकल्पनेचा उलगडा करताना भागवत म्हणाले, "धर्माकडे अनेक वेळा 'मजहब' म्हणून बघितले जाते. मात्र, धर्म म्हणजे, एखादा 'मजहब' नाही. धर्म म्हणजे सृष्टी ज्या नियमांनुसार चालते, त्याचे विज्ञान आहे. कुणी माने अथवा न माने, पण या नियमांच्या बाहेर कोणालाही कार्य करू शकत नाही." एवढेच नाही तर, "धर्मातील असंतुलन हे विनाशाचे कारण ठरते," असेही भागवत म्हणाले.

दोघांचेही अंतिम ध्येय 'सत्य शोधणे' हेच -भागवत पुढे म्हणाले, "ऐतिहासिकदृष्ट्या वैज्ञानिक संशोधनात धर्माचे काहीही स्थान नाही, असे माणून विज्ञानाने धर्मापासून अंतर राखले. मात्र, हा दृष्टिकोन मूलभूतपणे चुकीचा आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांच्यात केवळ कार्यपद्धतीचा फरक आहे, दोघांचेही अंतिम ध्येय 'सत्य शोधणे' हेच आहे.

भारताने केवळ आर्थिक किंवा सामरिक महाशक्ती नव्हे, तर 'विश्वगुरू' बनण्याचे ध्येय ठेवावे -पर्यावरणासारख्या जागतिक समस्यांचा उल्लेख करत सरसंघचालक म्हणाले, वैज्ञानिक ज्ञान जनतेपर्यंत त्यांच्या मातृभाषेतून पोहोचवणे आवश्यक आहे. भारताने केवळ आर्थिक किंवा सामरिक महाशक्ती बनण्याऐवजी 'विश्वगुरू' बनण्याचे ध्येय ठेवावे. भारत आपल्या वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून संपूर्ण मानवतेला नवी दिशा देऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी यावेली व्यक्त केला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : No conflict between religion and science: Mohan Bhagwat

Web Summary : Mohan Bhagwat stated that science and religion aren't conflicting but seek the same truth via different paths. He emphasized that 'Dharma' guides creation's rules, and imbalance causes destruction. India should aim to be a 'Vishwa Guru', guiding humanity with its scientific and religious perspectives.
टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ