शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 20:38 IST

कविता या केटीआरसह पक्षातील नेत्यांवर नाराज आहेत. त्या बीआरएस सोडून काँग्रेसमध्ये सहभागी होतील अशी चर्चा होती

तेलंगणात भारत राष्ट्र समितीमध्ये अंतर्गत कलह उघडपणे समोर आला आहे. एकीकडे बीआरएस रौप्य महोत्सव साजरा करत आहे तर दुसरीकडे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामा राव आणि त्यांची बहीण के. कविता यांच्यात उत्तराधिकारी कोण यावरून वाद रंगला आहे. माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या पक्ष अनेक मुद्द्यावर झगडत आहे. ज्यात आमदार पक्ष बदलून काँग्रेसमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे पक्ष कायदेशीर लढाईही लढत आहे. 

सूत्रांनुसार, पक्षावर कुणाचे नियंत्रण असणार, कमान कोणाच्या हाती द्यायची यावरून कुटुंबात घमासान सुरू आहे. उत्तराधिकारी लढाई तेव्हाच सुरू होते जेव्हा पक्षाचा सुप्रीमो बाहेर पडतो परंतु बीआरएसमध्ये सत्तेची लढाई तेव्हाच सुरू झाली जेव्हा के. चंद्रशेखर राव अद्यापही राजकारणात सक्रीय आहेत. पक्षात केसीआरचे नातेवाईक आधीच दोन गटात विभागले गेलेत. काही केटीआर तर काही के.कविता यांचे समर्थन करत आहेत. माजी खासदार आणि विद्यमान आमदार कविता यांनी वारंगलच्या बीआरएस रजत जयंतीला सार्वजनिक बैठकीत केसीआर यांच्या भाषणाबाबत त्यांना फिडबॅक पत्र लिहिले त्यातून हा वाद चव्हाट्यावर आला. TOI ने ही बातमी दिली आहे. 

या पत्रात केसीआर यांनी भाषणात भाजपाला टार्गेट न करणे, मागासवर्गीय आरक्षणावर  भाष्य न करणे याशिवाय बीआरएस नेते आणि त्यांच्या वागणुकीवर चिंता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे या दोघांमधील वाद १ वर्षापूर्वीच समोर आले. मागील काही महिन्यापासून हा वाद आणखी वाढला आहे. केटीआर यांनी कार्यकारी अध्यक्षपद स्वीकारल्यापासून कविता यांना मोठी जबाबदारी मिळाली नाही. त्यांना निजामाबाद पुरते मर्यादित ठेवण्यात आले आहे. मागील १ वर्षापासून त्यांना पक्षाकडून दुर्लक्षित करण्यात येत आहे असं कविता यांचे समर्थक सांगतात. 

कविता नाराज का?

कविता या केटीआरसह पक्षातील नेत्यांवर नाराज आहेत. त्या बीआरएस सोडून काँग्रेसमध्ये सहभागी होतील अशी चर्चा होती. त्यावर अनेक नेत्यांनी मौन बाळगले. कुठल्याही पक्षातील नेत्यांनी या अफवेचे खंडन केले नाही. ही बातमी पसरताच केटीआर हरिश राव यांच्या घरी पोहचले तिथे पक्षातील नेत्यांसोबत बैठक घेतली. केटीआर यांनी हरिश राव यांच्यासोबत मतभेद संपवले आणि एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला. परंतु कविता यांच्या प्रकरणी भाऊ केटीआर यांनी कुठलाही प्रयत्न केला नाही.

 

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती