शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनातून बरे झालेल्यांच्या संख्येत सातत्याने होतेय वाढ; उपचाराधीन रुग्णांचे प्रमाणही कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 06:13 IST

CoronaVirus : देशात कोरोनाचे १०९१६५८९ रुग्ण असून त्यातील १०६२१२२० जण बरे झाले. सोमवारी कोरोनाचे ११६४९ नवे रुग्ण सापडले, तर ९४८९ जण बरे झाले.

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनातून बरे झालेल्यांचा आकडा १ कोटी ६ लाख २१ हजार झाला असून त्यांचे प्रमाण ९७.२९ टक्के आहे. सोमवारी कोरोनामुळे ९० जण मरण पावले असून, ही संख्या १०० पेक्षा कमी असण्याची या महिन्यातील नववी वेळ आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्याही तुलनेने कमी आहे. देशात कोरोनाचे १०९१६५८९ रुग्ण असून त्यातील १०६२१२२० जण बरे झाले. सोमवारी कोरोनाचे ११६४९ नवे रुग्ण सापडले, तर ९४८९ जण बरे झाले. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या १३९६३७ असून त्यांचे प्रमाण १.२८ टक्के आहे. कोरोना बळींची एकूण संख्या १५५७३२ तर कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.४३ टक्के झाला आहे. सौदी अरेबियाने भारतासह २० देशांतील प्रवाशांना तात्पुरती प्रवेशबंदी लागू केली. हा आदेश २ फेब्रुवारीपासूनच लागू झाला आहे. सौदी अरेबियामध्ये ३ लाख ७१ हजारांपेक्षा अधिक रुग्ण असून ६४०० पेक्षा अधिक लोकांचा बळी गेला.

मात्र हे करायलाच हवेते म्हणाले की, लसीकरणाची मोहीम सुरू आहे. मात्र लोकांनी फिजिकल डिस्टन्स पाळणे व मास्क वापरणे आवश्यकच आहे. या दोन बाबी म्हणजे एका अर्थी सामाजिक लसच आहे. या दोन गोष्टींचे पालन केल्यास कोरोनाचा संसर्ग टाळता येईल.

आणखी १९ लसी लवकरच -डॉ. हर्षवर्धन

- कोरोनाविरोधी आणखी १८ ते १९ लसी जवळपास तयार असून, त्यांच्या चाचण्या सुरू आहेत, अशी माहिती देतानाच, भारतातून २० ते २५ देशांना लसींची निर्यात करण्यात येणार असल्याची माहितीही केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी दिली. देशातील ५० वर्षे वयावरील लोकांना दोन ते तीन आठवड्यांत लस देणे सुरू होईल, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. 

५० वर्षे वयावरील सुमारे २७ कोटी लाेकांना कोरोना लस देण्याच्या दृष्टीने पूर्ण तयारी झाली आहे. दोन ते तीन आठवड्यांत देशभर तिसऱ्या टप्प्यातील मोहीम सुरू होईल. सध्या ज्या दोन लसी दिल्या जात आहेत, त्यांच्या उपयुक्ततेविषयी उपस्थित केल्या जाणाऱ्या सर्व शंका निराधार असल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की, या लसींची उपयुक्तता वा क्षमता याआधीच सिद्ध झाली आहे. 

१८८ जिल्ह्यांत गेल्या सात दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तसेच गेल्या २१ दिवसांत २१ जिल्ह्यांमध्ये एकालाही या आजाराची लागण झालेली नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या