शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणात मोठा अडथळा, अर्थसंकल्पात संरक्षणासाठी पुरेशी तरतूदच नाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 07:41 IST

केंद्र सरकारनं संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद न केल्यानं संसदेच्या स्थायी समितीत वरिष्ठ लष्कर अधिका-यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात किरकोळ तरतुदी केल्यानं महागाई थोड्या फार प्रमाणात कमी होईल. परंतु त्याचा संरक्षण क्षेत्राला फायदा होणार नाही.

नवी दिल्ली- केंद्र सरकारनं संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद न केल्यानं संसदेच्या स्थायी समितीत वरिष्ठ लष्कर अधिका-यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात किरकोळ तरतुदी केल्यानं महागाई थोड्या फार प्रमाणात कमी होईल. परंतु त्याचा संरक्षण क्षेत्राला फायदा होणार नाही. भारतीय लष्करी जवानांची अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि जुन्या साधनांच्यादरम्यान मोठी असमानता आहे.भारतीय लष्कराकडे सामान्यरीत्या त्यांची शस्त्रास्त्रे आणि उपकरणांमध्ये 30 टक्के स्टेट-ऑफ-द-आर्ट टेक्नोलॉजी कॅटेगरी, 40 टक्के सध्याची टेक्नॉलॉजी आणि 30 टक्के विंटेज कॅटेगरी असणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे 12 लाख जवानांहून मोठ्या असलेल्या भारतीय लष्कराजवळ 8 टक्के स्टेट ऑफ द आर्ट, 24 टक्के सध्याची टेक्नॉलॉजी आणि 68 टक्के विंटेज कॅटेगरीची शस्त्रास्त्रे उपलब्ध आहेत. दुसरीकडे भारतीय लष्कराला वारंवार पाकिस्तानकडून होणारी शस्त्रसंधी आणि घुसखोरीचा सामना करावा लागतो.गेल्या वर्षी डोकलामच्या मुद्द्यावरून चीन आणि भारतामध्येही मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी आपल्याला पाकिस्तान आणि चीन या दोन आघाड्यांवर युद्ध लढावं लागलं असतं. आता ती भीतीही तशीच आहे. संसदीय समितीत लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल म्हणाले, 2018-19च्या अर्थसंकल्पानं आम्हाला निराश केलं आहे. सध्याची स्थिती पाहता संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात केलेली तरतूर पुरेशी नाही.दुसरीकडे अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी 21,338 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लष्कराला आधीपासूनच सुरू असलेल्या त्यांच्या 125 योजनांवर खर्च करण्यासाठी 29,033 कोटींची गरज आहे. गेल्या वर्षी झालेल्या उरी हल्ला आणि 2016च्या सर्जिकल स्टाइकमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र खरेदी करावी लागतायत. जेणेकरून 10 दिवस युद्धाचे परिस्थिती उद्भवल्यास गरजेची शस्त्रास्त्रं आणि दारूगोळ्याचा साठा करून ठेवावा लागेल.