शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा नोटबंदी? जेटलींचं मौन आणि चर्चेला उधाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 20:47 IST

मोदी सरकारने  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यास सांगितलंय का? हा प्रश्न बुधवारी समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी राज्यसभेत विचारला.

ठळक मुद्देरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली असल्याची माहिती असून चालू आर्थिक वर्षात नव्या नोटा बाजारात आणल्या जाणार नाहीत.दोनशे आणि पाचशे रूपयांच्या पुरेशा नोटा उपलब्ध झाल्यानंतर सरकार 2 हजारांच्या नोटा बंद करू शकते असं म्हटलं जात आहे. 2 हजारांच्या नोटा बंद केल्यामुळे सामान्य जनतेला त्याचा जास्त त्रास होणार नाही. त्यानंतर दोन हजार रूपयांची साठवणूक करणा-यांवर सरकार कठोर कारवाई करू शकते अशी जोरदार चर्चा आहे. 

नवी दिल्ली, दि. 26 - मोदी सरकारने  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यास सांगितलंय का? हा प्रश्न बुधवारी समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी राज्यसभेत विचारला. दुसरीकडे कॉंग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद  यांनी 1000, 500 आणि 200 रूपयांची नवी नाणी बाजारात येणार असल्याची जोरदार चर्चा असल्याचंही म्हटलं. त्यावर विरोधी पक्षांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. मात्र, जेटलींनी यावर काहीही उत्तर देण्यापेक्षा मौन धारण केलं.  नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली असल्याची माहिती असून चालू आर्थिक वर्षात नव्या नोटा बाजारात आणल्या जाणार नाहीत. त्यामुळेच सरकार दोनशे रूपयांच्या नव्या नोटा आणणार असल्याची जोरदार चर्चा आहे. दोनशे आणि पाचशे रूपयांच्या पुरेशा नोटा उपलब्ध झाल्यानंतर सरकार 2 हजारांच्या नोटा बंद करू शकते असं म्हटलं जात आहे. 2 हजारांच्या नोटा बंद केल्यामुळे सामान्य जनतेला त्याचा जास्त त्रास होणार नाही. त्यानंतर दोन हजार रूपयांची साठवणूक करणा-यांवर सरकार कठोर कारवाई करू शकते अशी जोरदार चर्चा आहे. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार,सध्या जे प्रिंटिंग सुरु आहे त्यामध्ये 90 टक्के 500 च्या नोटांचा समावेश आहे. 500 रुपयांच्या जवळपास 14 अब्ज नोटांची छपाई आतापर्यंत पुर्ण झाली आहे. हा आकडा नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर चलनातून बाद झालेल्या 500 च्या जुन्या नोटांच्या आकड्याच्या आसपास आहे. 500 रुपयांच्या 15.7 अब्ज नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. म्हैसूरमध्ये 200 रुपयांच्या नव्या नोटांची छपाई सुरु असून पुढील महिन्यात या नोटा बाजारात येतील अशी अपेक्षा आहे. 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली असली तरी 500 च्या नोटांची छपाई सुरु आहे. त्यामुळे 2000 च्या नोटांचा तुडवडा 500 च्या नोटा भरुन काढतील असं सांगण्यात आलं आहे. 20 जुलै रोजी इकॉनॉमिक टाईम्सने देशातील काही शहरांमध्य़े 2000 च्या नोटांचा तुडवडा भासत असल्याचं वृत्त दिलं होतं. 'गेल्या 40 दिवसांपासून आरबीआयने 500 रुपयांच्या नोटांचा पुरवठा सुरु केला असल्याने दोन महिन्यांपुर्वी जाणवणारा नोटांचा तुडवडा भरुन निघाला आहे', अशी माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाचे उप-व्यवस्थापकीय संचालक निरज व्यास यांनी दिली आहे. मात्र यादरम्यान 2000 रुपयांच्या पुरवठ्यात घट झाल्याचंही निदर्शनास आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.