शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

देशात आता हजार पुरुषांमागे महिलांची संख्या १०२०; राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण; एकूण प्रजनन दरात २ पर्यंत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 11:39 IST

२०१९ ते २०२१ या कालावधीत केलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचे (एनएफएचएस) हे निष्कर्ष काढण्यात आले. 

नवी दिल्ली : देशाच्या लोकसंख्येत पहिल्यांदाच दर हजार पुरुषांमागे महिलांची संख्या अधिक म्हणजे १०२० इतकी झाली आहे. यापूर्वी दर हजार पुरुषांमागे महिलांची संख्या ९९१ इतकी होती, तसेच एकूण प्रजनन दर २.२ वरून २ पर्यंत खाली घसरला आहे. २०१९ ते २०२१ या कालावधीत केलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचे (एनएफएचएस) हे निष्कर्ष काढण्यात आले. 

या सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये २२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित एनएफएचएस - ५चे निष्कर्ष डिसेंबर २०२०मध्ये जाहीर झाले होते. दुसऱ्या टप्प्यामध्ये अरुणाचल प्रदेश, चंदीगड, छत्तीसगड, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, दिल्ली, ओडिशा, पुुद्दुचेरी, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड येथे सर्वेक्षण करण्यात आले. देशातील ७०७ जिल्ह्यांतील सुमारे ६.१ लाख कुटुंबांची पाहणी करण्यात आली.  प्रत्येक महिलेने जन्म दिलेल्या अपत्यांची संख्या २.२ वरून २ पर्यंत खाली घसरली आहे. चंदीगडमध्ये हा जननदर १.४ असून, उत्तर प्रदेशमध्ये तो २.४ आहे. 

राष्ट्रीय पातळीवर रुग्णालयांत होणाऱ्या प्रसुतीचे प्रमाण ७९ वरून ८९ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. पुद्दुचेरी, तामिळनाडूमध्ये रुग्णालयात होणाऱ्या प्रसुतीचे प्रमाण १०० टक्के आहे. दुसऱ्या टप्प्यांतील १२पैकी ७ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांत हे प्रमाण ९० टक्के आहे. 

टॅग्स :WomenमहिलाIndiaभारत