शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारचा एकही रुग्ण भारतात नाही, पण...

By महेश गलांडे | Updated: December 22, 2020 09:54 IST

गुलेरिया म्हणाले, 'भारतात नव्या प्रकाराच्या विषाणूचं संक्रमण झालेला रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, आता आढळून येणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या करणं अत्यावश्यक झालेलं आहे. कारण आतापर्यंत आपण हे बघत होतो की, रुग्ण पॉझिटिव्ह आहे की नाही.

ठळक मुद्देगुलेरिया म्हणाले, 'भारतात नव्या प्रकाराच्या विषाणूचं संक्रमण झालेला रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, आता आढळून येणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या करणं अत्यावश्यक झालेलं आहे.

नवी दिल्ली -  ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानं संपूर्ण जग धास्तावलं आहे. यानंतर ब्रिटन आणि युरोपहून येणाऱ्या विमानांची वाहतूक रोखण्याचा निर्णय अनेक देशांनी घेतला आहे. भारत सरकारनंदेखील कालच ब्रिटनमधून येणारी विमानं रोखण्याचा निर्णय घेतला. ही बंदी ३१ डिसेंबरपर्यंत कायम असेल. कोरोनाचा नवा स्ट्रेन जास्त धोकादायक असल्यानं अनेक देशांकडून खबरदारी घेतली जात आहे. मात्र, भारतात कोरोनाच्या नव्या प्रकाराचा अद्याप एकही रुग्ण नसल्याचं एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितलंय. तरीही, खबरदारी घेण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. 

गुलेरिया म्हणाले, 'भारतात नव्या प्रकाराच्या विषाणूचं संक्रमण झालेला रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, आता आढळून येणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या करणं अत्यावश्यक झालेलं आहे. कारण आतापर्यंत आपण हे बघत होतो की, रुग्ण पॉझिटिव्ह आहे की नाही. आता आपल्याला विषाणूच्या जेनेटिक सीक्वेन्सही बघण्याची गरज पडणार आहे. विशेषतः जे लोक ब्रिटनमधून येत आहेत, त्यांच्यामध्ये नव्या प्रकाराच्या विषाणूचं जेनेटिक सीक्वेन्स तर नाही ना. तसेच, त्यांच्यात हा विषाणू आढळून आला, तर त्यांचं विलगीकरण करून, त्यांची देखरेख जास्त करावी लागणार आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यावर भर द्यावा लागणार आहे. ज्यामुळे सामूहिक स्वरूपात याचा प्रसार होऊ नये,” अशी खबरदारी घेण्याचं गुलेरिया यांनी सांगितलंय. गुलेरिया यांनी आजतक वृत्तवाहिनीशी बोलताना या विषयावर सविस्तर चर्चा केली. 

गुलेरिया म्हणाले, ''ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला आहे. हे कोरोना विषाणूचं नवं स्वरूप आहे. लंडन आणि दक्षिण ब्रिटनमध्ये हा विषाणू आढळून आला आहे. जिथे हा विषाणू आढळून आला, तिथे करोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढली आहे. यातून हे दिसून आलं आहे की, हा विषाणू वेगानं पसरत चालला आहे. मात्र, रुग्णांची प्रकृती गंभीर होत नाही. पण ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे लवकर पसरत आहे, त्यामुळे जिथे हा विषाणू पोहोचेल तिथे रुग्णसंख्या वेगानं वाढू शकते. त्यामुळे ब्रिटनहून येणारी विमानं रोखण्यात आली असून तेथून येणाऱ्या व्यक्तींवर विशेष नजर ठेवली जात आहे,” असेही गुलेरिया यांनी सांगितलं.  कोविड 20 ट्रेंडिंगमध्ये

सध्याच्या घडीला जगभरात कोरोना लसीवर संधोधन सुरू आहे. अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरू असल्यानं काही कंपन्यांच्या लसींच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे. आणखीही काही देशांनी लसीकरणास सुरुवात केली आहे. एकीकडे जग कोविड-१९ संकटातून बाहेर आलं नसताना आता कोविड-२० ची चर्चा सुरू झाली आहे. ट्विटरवर कोविड-२० ट्रेंडिंग आहे. कोविड-२० हॅशटॅग वापरून आतापर्यंत हजारो ट्विट्स करण्यात आली आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLondonलंडनAIIMS hospitalएम्स रुग्णालयdelhiदिल्लीairplaneविमान