शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

...तर तिप्पट झाले असते तुमचे बजेट, महिलांची काळजी करणारे सरकार - पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 09:56 IST

"महिला सन्मानाची काळजी करणारे सरकार पहिल्यांदाच केंद्रात आले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे महिला संवाद कार्यक्रमात म्हटले."

महाराजगंज : काँग्रेसचे सरकार असते तर तुमच्या स्वयंपाकघरातील बजेट दोन-तीन पटीने वाढले असते. विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ची मानसिकता महिलाविरोधी आहे. महिलांना आरक्षण देण्यास त्यांचा विरोध आहे. गेल्या १० वर्षांत पहिल्यांदाच माता, भगिनी व महिला सरकारी धोरणे आणि निर्णयांच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. महिला सन्मानाची काळजी करणारे सरकार पहिल्यांदाच केंद्रात आले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे महिला संवाद कार्यक्रमात म्हटले.

मोदी म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर नसते तर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातींना (एसटी) आरक्षण मिळू दिले नसते. भ्रष्टाचार, तुष्टीकरणाचे राजकारण व सनातनविरोधी विचारसरणी यांच्यासोबत इंडिया आघाडी उभी आहे आणि ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या सर्वांना मोठा धक्का बसेल, असा आरोपही पंतप्रधानांनी केला.मोदींनी आरोप केला की, “काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी मिळून देशाची ६० वर्षे उद्ध्वस्त केली आहेत. गरीब अधिक गरीब होत गेला. तुमचे मत केवळ खासदार निवडण्यासाठी नाही, तर तुमचे मत सशक्त भारतासाठी मजबूत पंतप्रधान निवडण्यासाठी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पहिल्या पाच टप्प्यांत भाजप ३१० जागा जिंकेल, अमित शाह यांचा दावा -लोकसभा निवडणुकांचे पाच टप्पे पूर्ण झाले असून, त्यात भाजप ३१० जागा जिंकेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केला. ओदिशाची ‘बाबू-राज’पासून मुक्तता करा, असे आवाहन त्यांनी त्या राज्याच्या जनतेला केले. संबलपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार व केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारसभेत शाह यांनी सांगितले की, लोकसभेच्या सहाव्या व सातव्या टप्प्यानंतर एनडीए ४००पेक्षा जास्त जागा जिंकण्याची शक्यता आहे. ओदिशामध्ये सरकारी अधिकारीच राज्य चालवत आहेत. ही स्थिती संपविण्यासाठी विधानसभा निवडणुकांतही भाजपला विजयी करा, असे आवाहन अमित शहा यांनी केले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीWomenमहिला