शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

"...तर आपण सर्व नामशेष होऊ"! इस्रो प्रमुख सोमनाथ यांचा पृथ्वीवासीयांना मोठा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 18:11 IST

यापूर्वी ३० जून १९०८ रोजी सायबेरियातील तुंगुस्का नावाच्या एका दुर्गम भागात, अशाच एका लघुग्रहाच्या धडकेमुळे झालेल्या मोठ्या स्फोटात सुमारे २२०० चौरस किलोमीटर एवढे घनदाट जंगल उद्ध्वस्त झाले होते. या घटनेत 8 कोटी झाडे नष्ट झाली होती.

एक 370 मीटर व्यासाचा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार आहे. हा ग्रह पृथ्वीला धडकण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. यापूर्वी ३० जून १९०८ रोजी सायबेरियातील तुंगुस्का नावाच्या एका दुर्गम भागात, अशाच एका लघुग्रहाच्या धडकेमुळे झालेल्या मोठ्या स्फोटात सुमारे २२०० चौरस किलोमीटर एवढे घनदाट जंगल उद्ध्वस्त झाले होते. या घटनेत 8 कोटी झाडे नष्ट झाली होती. आता जो लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येत आहे, तो १३ एप्रिल २०२९ रोजी जवळून जाण्याची शक्यता आहे. असेही म्हटले जाते की, असे लघुग्रह जेव्हा पृथ्वीवर आदळतात तेव्हा अनेक प्रजाती नामशेष होतात. अशाच एका घटनेमुळे पृथ्वीवरून डायनासोर  नामशेष झाल्याचे मानले जाते.

काय म्हणाले एस सोमनाथ -सोमनाथ म्हणाले, "आपला जीवनकाळ साधारणपणे 70 ते 80 वर्षांचा आहे आणि आपण आपल्या आयुष्यात अशी खुठल्याही प्रकारची आपत्ती बघत नाही. यामुळे असे घडूच शकत नाही, असे आपल्याला वाटते. जगाचा आणि विश्वाचा इतिहास पाहिला, तर मी लघुग्रह शुमेकर-लेव्हीला धडकल्याचे बघितले आहे. जर पृथ्वीवर अशी घटना घडली तर आपण सर्व नामशेष होऊ.

यासाठी इतर देशांसोबत संयुक्तपणे काम करणेही आवश्यक -याच बरोबर, “ही वास्तविक शक्यता आहे. आपण स्वतःला तयार करायला हवे. पृथ्वीवर असे काही घडू नये, अशीच आपली सर्वाची इच्छा आहे. मानवासह सर्व जीवांनी येथे राहायला हवे. मात्र, आपण हे रोखू शकत नाही. यासाठी आपल्याला पर्याय शोधावे लागतील. आपण पृथ्वीजवळ येणारा लघुग्रह शोधू शकतो आणि तो दूर करू शकतो. मात्र, कधीकधी हे अशक्यही होऊ शकते. यामुळे तंत्रज्ञान विकसित करण्याची आवश्यकता आहे. अंदाज बांधण्याची क्षमता वाढविण्याची आवश्यकता आहे. याशिवाय, यासाठी इतर देशांसोबत संयुक्तपणे काम करणेही आवश्यक आहे," असेही सोमनाथ म्हणाले.

जागतिक लघुग्रह दिनानिमित्त (३० जून) इस्रोने आयोजित केलेल्या कार्यशाळेत सोमनाथ बोलत होते.

टॅग्स :isroइस्रोEarthपृथ्वी