शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

"...तर आम्ही खपवून घेणार नाही"; भारताच्या सीमा प्रश्नावरून चीन-अमेरिका भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 12:23 IST

सीमा प्रश्नावर अमेरिकेने भारताची बाजू घेताच चीनने दिला इशारा

नवी दिल्ली - गेल्या अनेक महिन्यांपासून भारत-चीन सीमा संघर्षावर सध्या स्थिरता आहे. भारत-चीन सीमा प्रश्नावर तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप सहन करणार नाही असं सांगत चीनने अमेरिकेवर निशाणा साधला आहे. भारतातील चीनी दूतावास वांग जिआओजियानने मंगळवारी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांच्या विधानावर पलटवार केला आहे. अमेरिका जगावर स्वत:च्या वर्चस्वासाठी सर्व प्रकार वापरते असा आरोप त्यांनी केला. 

अमेरिकेच्या विधानावर चीनचे दूतावास वांग जिआओजियान यांनी म्हटलं की, जगात शांती आणि समृद्धीसाठी चीनचे योगदान आहे. चीन नव्हे तर अमेरिका तो देश आहे जो बळजबरीने स्वत:चे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करते. अमेरिकेच्या दबावामुळे आणि धमकावल्यामुळे त्याचे सहकारी देश आणि भागीदार राष्ट्रही त्रस्त आहेत. अमेरिकेच्या या वृत्तीचा परिणाम विकसित देशांवर होत आहे असा चीनने आरोप केला. 

त्याचसोबत भारत-चीन यांच्यातील सीमा संघर्षावर सध्या शांतता आहे. सध्या कुठेही दोन्ही सीमांवर झटापटी होत नाही. सीमेबाबत जो प्रश्न आहे तो भारत आणि चीन या दोन देशातील प्रश्न आहे. त्यात तिसऱ्या देशाने हस्तक्षेप केलेला आम्ही खपवून घेणार नाही असंही वांग यांनी ट्विटरवरून अमेरिकेला बजावले आहे. 

काय म्हणाले होते अमेरिकेचे संरक्षणमंत्री?अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी सोमवारी सांगितले की, सध्याच्या जागतिक परिस्थितीत चीनकडून जगावर दादागिरी सुरू आहे. शांती आणि समृद्धी कायम ठेवण्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्र नेतृत्व करण्याची गरज आहे. आम्हाला अजूनही खूप काम करायचे आहे. परंतु यूएस इंडिया भागीदारी इंडो पॅसेफिक आणि जगासाठी समृद्ध भविष्याचा मार्ग निर्माण करण्यात मदत करणार आहे. त्याचसोबत भारत-चीन सीमा संघर्षात अमेरिकेने कायम भारताचे समर्थन केले आहे. एप्रिलमध्ये एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, चीनकडून मिळणाऱ्या आव्हानाच्या काळात भारत अमेरिकेवर भरवसा ठेऊ शकतो. सीमा संघर्ष दोन्ही देशांनी मिळून सोडवायला हवा. जर चीनसोबत काही संघर्ष झाला तर अमेरिका भारताला पूर्ण पाठिंबा देईल असं विधान अमेरिकेकडून करण्यात आले आहे.  

टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिकाchinaचीन