शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 08:11 IST

भारतीय कायद्यात ‘प्रेमात दुरावा’ या संकल्पनेला थेट मान्यता नसली तरी तृतीय व्यक्तीने जाणीवपूर्वक वैवाहिक नात्यात हस्तक्षेप केल्यास नुकसानभरपाईचा दावा ग्राह्य ठरू शकतो.

डॉ. खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली - विवाहसंबंधात तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे प्रेमात दुरावा निर्माण झाल्याचे म्हणत यास जबाबदार पतीच्या प्रेयसीकडून नुकसानभरपाई मागणारी  याचिका दिल्ली हायकोर्टाने ग्राह्य धरली आहे.

शेली महाजन यांचा २०१२ मध्ये विवाह झाला. दाम्पत्याला २०१८ मध्ये जुळी मुले झाली. २०२१ मध्ये भानुश्री ही महिला पतीच्या व्यवसायात सामील झाली.  पुढे तिचे पतीसोबत प्रेमसंबंध विकसित झाले. २०२३ मध्ये पत्नीला याचे ठोस पुरावे मिळाल्यानंतर तणाव तीव्र झाला. पत्नीने जाब विचारल्यावर पतीने उघडपणे भानुश्रीसोबत सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावून पत्नीला अपमानित करणे सुरू केले.  

एप्रिल २०२५ मध्ये पतीने घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात अर्ज केला. यानंतर पत्नीने नागरी नुकसानभरपाईसाठी हायकोर्टात दावा केला. या दाव्यावर भानुश्रीच्या वतीने आक्षेप घेताना हा वाद वैवाहिक बंधातूनच निर्माण झालेला असून, त्यावर सुनावणीचा अधिकार केवळ फॅमिली कोर्टालाच आहे, असे म्हटले.  

प्रौढांना स्वेच्छेने नातेसंबंध ठेवण्याचा अधिकार घटस्फोटाच्या प्रकरणात आधीच व्यभिचाराचा मुद्दा उपस्थित झाला असून, त्यावर निर्णय झालेला नाही. हा दावा फक्त त्याला प्रत्युत्तर आहे. प्रौढ व्यक्तींना स्वेच्छेने नातेसंबंध ठेवण्याचा अधिकार असून, पत्नीला तो रोखण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाद करण्यात आला. पत्नीच्या वकिलांनी मात्र तिसऱ्या व्यक्तीच्या जाणीवपूर्वक वर्तनामुळे तिला पतीच्या प्रेमापासून वंचित व्हावे लागले. दिवाणी कायद्यानुसार अशा हस्तक्षेपाबाबत नुकसानभरपाई मागण्याचा अधिकार आहे, असा दावा केला.

हायकोर्टाचे निरीक्षणभारतीय कायद्यात ‘प्रेमात दुरावा’ या संकल्पनेला थेट मान्यता नसली तरी तृतीय व्यक्तीने जाणीवपूर्वक वैवाहिक नात्यात हस्तक्षेप केल्यास नुकसानभरपाईचा दावा ग्राह्य ठरू शकतो. फॅमिली कोर्टाचा अधिकार वैवाहिक विवादांपुरता मर्यादित असून, स्वतंत्र दिवाणी दाव्यावर दिवाणी न्यायालयाला सुनावणीचा अधिकार आहे. घटस्फोटाचा खटला सुरू असला, तरी पतीबरोबर संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पत्नीला स्वतंत्र दिवाणी नुकसानभरपाईचा दावा करता येतो. पतीला वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क असला तरी तृतीय व्यक्तीने जाणीवपूर्वक हस्तक्षेप केल्यास दिवाणी जबाबदारी निर्माण होते. - न्यायमूर्ती पुरुषेन्द्र कुमार कौरव  

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयhusband and wifeपती- जोडीदार