kumar vishwas says yogi adityanath will be pm of india after narendra modi
देशातील प्रसिद्ध कवी, डॉ. कुमार विश्वस यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भविष्यात पंतप्रधान होण्यासंदर्भात भविष्यवाणी केली आहे. तसेच ते भारतातील सर्वात आशावादी स्त्रोत असल्याचेही म्हटले आहे. यावेळी त्यांनी भुतकाळातील उदाहरणही दिले. देशातील माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेई यांच्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त कुमार विश्वस म्हणतात, "आज सकाळी मी बघितले की, माझे डावे आणि काँग्रेसचे मित्र अटलजींचे प्रचंड कौतुक करत होते. पंतप्रधान असताना त्यांच्याबद्दल काय बोलले गेले हे मला चांगले आठवते." कुमार विश्वास अलाहाबाद विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ प्रसंगी बोलत होते.
कुमार विश्वस पुढे म्हणाले, "जेव्हा अटलजींचा काळ होता, तेव्हा त्यांना कट्टर व्यक्ती म्हणून संबोधले जात होते. पण जेव्हा आडवाणीजी आले, तेव्हा या लोकांनी अटलजीचे कौतुक करायला सुरवात केली. यानंतर, जेव्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा अटल-आडवाणी यांचे कौतुक करायला सुरुवात केली." यानंतर, योगी आदित्यनाथांच्या पंतप्रधान होण्यासंदर्भात भविष्यवाणी करताना कुमार विश्वस म्हणाले, "तो दिवस दूर नाही, जेव्हा योगी केंद्रात येतील, तेव्हा हेच लोक म्हणतील की, नरेंद्र मोदी चांगले व्यक्ती आहेत."
अलाहाबाद विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभास संबोधित करताना डॉ. कुमार विश्वस म्हणाले, "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या देशातील उर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत आहेत. योगी आदित्यनाथ रामराज्याची संकल्पना साकार करत आहेत.