शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी
2
काळजाचा थरार! ११ वर्षीय शिवमनं बिबट्याच्या हल्ल्यातून ९ वर्षीय बहीण स्वरांजलीला वाचवले
3
वेदा‍ंता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं निधन
4
अमेरिका-रशियात तणाव वाढला! व्हेनेझुएलाहून जाणारा रशियन तेल टँकर US नौदलाने जप्त केला
5
उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?
6
मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत
7
मासेमारी करताना समुद्रात पडला खलाशी; ४ दिवसांनी मध्यरात्री 'असं' काय घडलं, कुटुंबाला बसला शॉक
8
पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन
9
"भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही"; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट
10
Maharashtra Government: सर्व पक्षांच्या प्रतोदांची पॉवर वाढली! आता थेट मंत्रिपदाचा दर्जा; अलिशान सुविधाही मिळणार
11
रक्षकच बनला भक्षक! चालत्या गाडीत पोलिस निरीक्षकाचा 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
12
Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ४ जण ठार, ६ गंभीर जखमी
13
Shirdi Crime: 'तुझा नवरा माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील', अपहरण, हत्या आणि टायर टाकून जाळले; शिर्डीतील घटना
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात चकमक; सुरक्षा दलांनी घनदाट जंगलात दहशतवाद्यांना घेरले
15
AIMIM सोबत युती भोवणार, भाजपा आमदाराला पक्षाची नोटीस; "पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला..."
16
Plastic Water Bottle: गाडीत ठेवलेल्या बाटलीतील पाणी पिता का? तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा!
17
'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...
18
"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले
19
किंग कोहलीभोवती चाहत्यांचा गराडा; 'विराट' गर्दीतून कसा बसा कारपर्यंत पोहोचला! व्हिडिओ व्हायरल
20
बापाचे काबाडकष्ट! १५ वर्षे दोन नोकऱ्या करून लेकीला दिलं शिक्षण; सर्वत्र होतंय भरभरून कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 05:46 IST

दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवा अन्यथा ‘ऑपरेशन सिंदूर’च्यावेळी दाखवला तसा संयम पुढच्या वेळी दाखवणार नाही!

अनुपगड/जयपूर : जर पाकिस्तानला जागतिक नकाशावर टिकून राहायचे असेल, तर त्याने आपल्या भूमीवरून दहशतवाद्यांना आश्रय व पाठिंबा देणे थांबवले पाहिजे, असे खडेबोल भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शुक्रवारी पाकिस्तानला सुनावले. ‘ऑपरेशन सिंदूर १’ दरम्यान भारताने दाखवलेला संयम पुढच्या वेळी दाखवला जाणार नाही. भारतीय जवानांनो पूर्णपणे सज्ज राहा, ईश्वराची इच्छा असेल तर लवकरच संधी येईल, असेही सूचक उद्गार द्विवेदी यांनी काढले.

राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यातील अनुपगड येथे भारतीय लष्कराच्या जवानांशी संवाद साधताना द्विवेदी म्हणाले की, पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी तळांचे पुरावे भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान साऱ्या जगासमोर मांडले. भारताने ही वस्तुस्थिती उघड केली. अन्यथा पाकिस्तानने या गोष्टी दडवून ठेवल्या असत्या, असे जनरल द्विवेदी म्हणाले. 

‘आव्हाने पेलण्यास जवानांबरोबर नागरिकही सज्ज’लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, सीमावर्ती भागात राहणारे लोक हे देखील सैनिकच आहेत. ते लोक सैन्याच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. देशासमोर उभी ठाकणारी सर्व आव्हाने पेलण्यास लष्कराबरोबर भारतीय नागरिकही सज्ज आहेत. 

अखंडतेसाठी कोणत्याही सीमा ओलांडू शकतो भारत हैदराबाद : २०१६ सालचा सर्जिकल स्ट्राइक, २०१९ सालचा बालाकोट हवाई हल्ला आणि नुकतेच झालेले ‘ऑपरेशन सिंदूर’ अशा घटनांतून देशाची एकता व अखंडता अबाधित राखण्यासाठी भारत कोणत्याही सीमा ओलांडू शकतो, असे एनडीए सरकारने दाखवून दिल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी येथे केले. 

पाकची १२ लष्करी विमाने पाडली : हवाई दलप्रमुखनवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय हवाई दलाच्या कारवाईत पाकिस्तानची एफ-१६सह किमान १२ लष्करी विमाने भारताने पाडली, किंवा त्या विमानांची मोठी हानी झाली असल्याची माहिती हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी शुक्रवारी दिली. 

भारतीय विमाने पाडल्याचे पाकिस्तानचे दावे खोटे आहेत. जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते दाखवावेत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. ए. पी. सिंग यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये पाकिस्तानातील लष्करी ठाणी, हवाई तळांचे मोठे नुकसान झाले. 

ऑपरेशन सिंदूरनंतर विविध दहशतवादी गटांनी खैबर पख्तुनख्वा प्रांतात आपले तळ हलविले. भारतीय हवाई दलाकडे अशा तळांवर अचूक हल्ला करण्याची पूर्ण क्षमता आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये एस-४०० एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिमने उत्तम कामगिरी केली, असेही ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan will vanish if it harbors terrorists: Indian Army Chief.

Web Summary : Army Chief General Dwivedi warned Pakistan to stop harboring terrorists or face consequences. India's resolve is firm, demonstrated by past actions. Air Force reports significant damage to Pakistani military assets during Operation Sindoor. Defence Minister Rajnath Singh affirmed India's commitment to national integrity.
टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तान