नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गाने देशासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि देशातील जनतेला कोरोनावरील लस उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यानंतर ती देशातील किती नागरिकांना आणि कधी दिली जाईल असी विचारणा केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आयसीएमआरने आज कोरोनाची लस आणि लसीकरणाबाबत मोठं विधान केलं आहे.कोरोनावरील लस ही देशातील प्रत्येक नागरिकाला द्यावी लागणार नाही, असे आयसीएमआरने म्हटले आहे. याबाबत माहिती देताना आयसीएमआरने सांगितले की, कोरोनावरील लसीकरण हे लस कितपत प्रभावी आहे त्यावर अवलंबून असेल. कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडणे हे आमच्ये लक्ष्य आहे. जर आम्ही धोका असलेल्या अधिकाधिक लोकांचे लसीकरण करून कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यात यशस्वी ठरलो तर कदाचित आम्हाला देशातील संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करावे लागणार नाही.
...तर देशातील प्रत्येकाला नाही द्यावी लागणार कोरोनावरील लस, आयसीएमआरचं मोठं विधान
By बाळकृष्ण परब | Updated: December 1, 2020 18:24 IST
coronavirus News : कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यानंतर ती देशातील किती नागरिकांना आणि कधी दिली जाईल असी विचारणा केली जात आहे.
...तर देशातील प्रत्येकाला नाही द्यावी लागणार कोरोनावरील लस, आयसीएमआरचं मोठं विधान
ठळक मुद्देकोरोनावरील लसीकरण हे लस कितपत प्रभावी आहे त्यावर अवलंबून असेलकोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडणे हे आमच्ये लक्ष्य आहे धोका असलेल्या अधिकाधिक लोकांचे लसीकरण करून कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यात यशस्वी ठरलो तर कदाचित आम्हाला देशातील संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करावे लागणार नाही