शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

Video: जगातील सर्वात वयस्कर 'राजा' वाघाचा मृत्यू; २६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 15:06 IST

रॉयल बंगाल टायगर 'राजा'चे वय २६ वर्षे १० महिने आणि १८ दिवस एवढे होते.

नवी दिल्ली । 

दिवसेंदिवस जगभरातील वाघांची संख्या कमी होत चालली आहे. त्यात आणखी एक भर पडली आहे. कारण भारत आणि जगातील सर्वात वयस्कर (Oldest Tiger of world Dies) असलेल्या 'राजा' वाघाचामृत्यू झाला आहे. एसकेबी रेस्क्यू सेंटरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाने वयाच्या २६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. राजा वाघाला पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वारा येथील व्याघ्र पुनर्वसन केंद्रामध्ये ठेवण्यात आलं होतं. लक्षणीय बाब म्हणजे राजा हा देशातील सर्वाधिक काळ जगणाऱ्या वाघांपैकी एक होता. 

रॉयल बंगाल टायगर 'राजा'चे वय २६ वर्षे १० महिने आणि १८ दिवस इतकं होतं. तसेच राजा २३ ऑगस्ट रोजी आपला २७ वा वाढदिवस साजरा करणार होता. मात्र तो २७ व्या वाढदिवसाला मुकला आणि ४० दिवस आधीच जगाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे त्याच्या वाढदिवसाची तयारी देखील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केली होती. 

२६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासएसकेबी रेस्क्यू सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, काल म्हणजेच सोमवारी पहाटे ३ वाजता राजा वाघाचा मृत्यू झाला. वृद्धापकाळामुळे राजा मागील काही दिवसांपासून अन्न ग्रहण करत नव्हता अशी माहिती वनअधिकाऱ्यांनी दिली. राजाच्या मृत्यूच्या बातमीने प्राणीप्रेंमीमध्ये शोककळा पसरली आहे. अलीपूरद्वारचे जिल्हा दंडाधिकारी सुरेंद्र कुमार मीना आणि वन संचालनालयाचे अधिकारी दीपक एम यांच्यासह वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रॉयल बंगाल टायगर राजाला श्रद्धांजली वाहिली.

मगरीच्या हल्ल्यात झाला होता जखमी २००६ मध्ये 'राजा'ला सुंदरबनमधून जखमी अवस्थेत पकडण्यात आलं होतं. त्यामुळे त्याला पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथील व्याघ्र पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आलं. तिथे त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र अखेर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. वनविभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुंदरबनमधील माताळा नदी ओलांडत असताना 'राजा'वर मगरीने हल्ला केला होता ज्यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. तसेच 'राजा' वाघ मागील काही दिवसांपासून आजारी होता. त्याने काही दिवसांपूर्वी खाणेपिणेही सोडले होते. राजा याचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप समोर आला नाही अशी माहिती जिल्हा दंडाधिकारी सुरेंद्र कुमार यांनी दिली.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यूwest bengalपश्चिम बंगाल