शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:37 IST

F-35B व्हेरिएंट विशेषतः लहान धावपट्टी किंवा विमानवाहू जहाजांवरून कमी अंतरावर टेक-ऑफ आणि व्हर्टिकल लँडिंगसाठी डिझाइन केलेले आहे

ब्रिटीश रॉयल नेव्हीचे अत्याधुनिक F 35B स्टील्थ फायटर जेट मागील ४८ तासांपासून केरळच्या तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभे आहे. हे जगातील सर्वात महागडे विमान मानले जाते. १४ जूनला रात्री खराब वातावरण आणि पुरेसे इंधन नसल्याने या विमानाला केरळमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. आतापर्यंत हाइड्रोलिक बिघाडामुळे हे विमान त्यांच्या मूळ स्थानी म्हणजे HMS प्रिंस ऑफ वेल्स विमानवाहू जहाजावर परतू शकले नाही.

विशेष म्हणजे हे विमान भारतीय वायूसेनेने सहज डिटेक्ट केले होते. कारण F 35B स्टील्थ फायटर जेट कुठल्याही रडारद्वारे डिटेक्ट करणे खूप कठीण असल्याचे बोलले जाते. त्यामुळे भारतीय हवाई दलाने हे विमान डिटेक्ट करणे हे मोठं यश आहे. हे लढाऊ विमान ब्रिटनचे विमानवाहू जहाज HMS प्रिंस ऑफ वेल्सच्या कॅरियर स्ट्राइक ग्रुपचा भाग होते ज्यांनी अलीकडेच भारतीय नौदलासोबत मिळून संयुक्त सैन्य अभ्यास पूर्ण केला आणि सध्या ते इंडो पॅसिफिक भागात तैनात आहे. सध्या ब्रिटीश तंत्रज्ञान टीम हे विमान दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहे.

अपवादात्मक घटना, परंतु गंभीर नाही - भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दलाने या घटनेला सामान्य परिस्थिती असल्याचे सांगत ब्रिटीश वायूसेनेसोबत तांत्रिक मदत करत आहे अशी माहिती दिली. परंतु कुठल्याही परदेशी देशाचे स्टील्थ फायटर जेट इतका दीर्घकाळ भारतीय जमिनीवर उभे राहणे अपवादा‍त्मक मानले जात आहे. विशेषत: जेव्हा F 35 सारख्या बहुप्रतिक्षित आणि महागड्या फायटर जेट प्रोग्रामची चर्चा आहे. F-35B व्हेरिएंट विशेषतः लहान धावपट्टी किंवा विमानवाहू जहाजांवरून कमी अंतरावर टेक-ऑफ आणि व्हर्टिकल लँडिंगसाठी डिझाइन केलेले आहे. त्याचे हे वैशिष्ट्य जगातील इतर लढाऊ विमानांपेक्षा वेगळे आहे. 

तांत्रिक बिघाड की खराब हवामान?

शनिवारी रात्री ९.२० च्या सुमारास भारतीय नौदलासह संयुक्त सरावानंतर F 35B फायटर जेटने तिरुवनंतपुरम हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला कमी इंधनामुळे लँडिंग करण्याची परवानगी मागितली. हे विमान हिंद महासागरावर उड्डाण घेत होते त्यामुळे त्याला तातडीने परवानगी दिली. यावेळी विमानतळावर आपत्कालीन तयारी करण्यात आली. विमान रात्री ९.२८ मिनिटांनी सुरक्षित लँडिग झाले. लँडिंगनंतर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे पुढे आले. हाइड्रोलिक सिस्टम समस्येमुळे या विमानाला उड्डाण घेण्याची परवानगी नाही. काही रिपोर्टनुसार, खराब वातावरणामुळे या विमानाचे पुन्हा सुरक्षित लँडिंग शक्य नाही तर काही तज्ज्ञ तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करत आहेत. 

दरम्यान, या वर्षीच्या सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात अमेरिकेने भारताला F 35 हे खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला. अमेरिकेने त्यांच्या आधीच्या धोरणात बदल केला, ज्यात F 35 विमानाची विक्री काही मर्यादित देशांपुरती ठेवण्यात आली होती. F 35 लढाऊ विमान हे पाचव्या पिढीतील मल्टीरोल स्टील्थ विमान मानले जाते. त्याला अत्याधुनिक रडार इवेशन आणि सेंसर फ्यूजन तंत्रज्ञानाने विकसित केले आहे जे त्याला आणखी घातक आणि स्मार्ट बनवते. 

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतindian air forceभारतीय हवाई दल