शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

योगी सरकारचा लाचखोर कर्मचाऱ्यांना दणका; एका फोनवर महिलेला मिळाली नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 16:15 IST

Uttar Pradesh : हे प्रकरण मेरठच्या थाना लालकुर्ती भागातील भागीरथी आर्य कन्या इंटर कॉलेजशी संबंधित आहे, जिथे प्रवक्ता पदासाठी नियुक्ती देण्यासाठी गेल्या 4 महिन्यांपासून महिला प्रवक्त्याला त्रास दिला जात होता.

मेरठ : उत्तर प्रदेशातील योगी सरकार 2.0 लाचखोरीच्या बाबतीत आणखी कठोर झाले आहे. याचे पहिले उदाहरण मेरठमध्ये पाहायला मिळाले असून लाचखोरीच्या तक्रारीवर तत्काळ कारवाई करण्यात आली आणि 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे, पीडितेच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तिच्या तक्रारीची त्वरित दखल घेतली आणि ती निकाली काढली, ज्यासाठी तिने 'धन्यवाद सीएम' म्हटले आहे.

प्रवक्ता पदावरील नियुक्तीसाठी लाच मागितली जात होतीहे प्रकरण मेरठच्या थाना लालकुर्ती भागातील भागीरथी आर्य कन्या इंटर कॉलेजशी संबंधित आहे, जिथे प्रवक्ता पदासाठी नियुक्ती देण्यासाठी गेल्या 4 महिन्यांपासून महिला प्रवक्त्याला त्रास दिला जात होता. एवढेच नाही तर रुजू होण्याच्या नावाखाली 3 महिन्यांच्या पगाराएवढी लाचही मागितली होती.

3 जणांविरुद्ध एफआयआरमहिला प्रवक्त्या वैतागल्या आणि त्यांनी सीएम पोर्टलवर आपली तक्रार नोंदवली. त्यानंतर लाच प्रकरणात व्यवस्थापक, मुख्याध्यापक आणि लिपिक यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार, आयुक्त आणि एसएसपी यांच्या मध्यस्थीनंतर या प्रकरणी लाल कुर्ती पोलिस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आता आरोपींविरुद्ध तपास सुरू करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांना म्हटले 'थँक्यू' दुसरीकडे, महिला प्रवक्त्या ताबडतोब रुजू झाल्या आणि आता त्या महाविद्यालयात आपले काम चोख बजावत आहे. ज्यावेळी मीडियासोबत पीडित प्रवक्त्या संगीता सोलंकी यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी  सांगितले की आपला मुख्यमंत्र्यांवर आधीपासूनच विश्वास आहे आणि समस्या त्वरित सुटली आहे. तसेच, यासाठी संगीता सोलंकी यांनी मुख्यमंत्र्यांना 'थँक्यू' देखील म्हटले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथBribe Caseलाच प्रकरण