शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विक्रम लँडरची चंद्रावरील झेप मोठ्या प्लॅनचा भाग होता; इस्त्रोच्या प्रयोगावर खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 16:20 IST

रविवारी सायंकाळी नासाचे कॅप्सुल एका भल्या मोठ्या शुद्र ग्रहाचे अवशेष घेऊन पृथ्वीवर आले होते. ही किमया काही देशच करू शकतात.

चंद्रावर झोपलेला विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर दिवस उजाडला तरी जागे झालेले नाहीएत. यामुळे अवघे जग चिंतेत असताना इस्त्रो विक्रम झोपण्यापूर्वी वेगळीच तयारी करत होते. चंद्रयान ३ मोहिम पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. ज्यासाठी प्रज्ञान गेले होते ते काम पूर्ण झाले आहे. आता इस्त्रोच्या प्रयोगावर खुलासा झाला आहे. 

इस्त्रो आता चंद्रयान चंद्रावरील नमुने घेऊन पुन्हा पृथ्वीवर परतू शकेल याची तयारी करत आहे. यासाठीच विक्रम झोपण्यापूर्वी लँडरचे चंद्रावर छोटेसे उड्डाण करण्यात आले होते. याला संशोधक त्यांच्या भाषेत हॉप टेस्ट असे म्हणतात. चंद्राने चाळीस सेंटीमीटर मारलेली उडी या योजनेचाच भाग होती. हा व्हिडीओ अवघ्या जगाने पाहिला होता. 

रविवारी सायंकाळी नासाचे कॅप्सुल एका भल्या मोठ्या शुद्र ग्रहाचे अवशेष घेऊन पृथ्वीवर आले होते. ही किमया काही देशच करू शकतात. इस्त्रोला ही ताकद आत्मसात करायची आहे. याची तयारी म्हणून विक्रमला उंच उडी मारायला लावून पुन्हा ते चंद्रावर लँड करण्यात आले होते. 

येत्या काळात चंद्रावरून सॅम्पल आणले जाऊ शकते. यासाठी या हॉप प्रयोगाचा डेटा महत्वाचा ठरणार आहे. इस्त्रोच्या एका अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाईम्सला ही माहिती दिली आहे. यापुढील काळातही इस्त्रो चंद्रावर असे प्रयोग करणार आहे, जेणेकरून तेथील सॅम्पल पुन्हा पृथ्वीवर आणता येतील. या साठी सध्या कोणतीही डेडलाईन निश्चित करण्यात आलेली नाहीय. या दिशेने सिस्टिम विकसित करण्यासाठी काम सुरु आहे. यामुळे यान रिटर्न फ्लाईट घेऊ शकणार आहेत. हा त्या मोठ्या प्लॅनचा ट्रेलर आहे, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.   

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3