शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चांदोमामाच्या अंगणात ‘प्रग्यान’च्या बाललीला, ‘विक्रम’ने टिपलेल्या व्हिडीओचे केले वर्णन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 05:08 IST

व्हिडीओबाबत इस्रोने लिहिलेल्या पोस्टला सर्वांनी दाद दिली आहे.

बंगळुरू : चांदोमामाच्या अंगणात लहान मूल खेळताना त्याची आई जसे प्रेमाने पाहते तसेच काहीसे गुरुवारी झाले. हे काव्यमय वर्णन केले आहे इस्रोने. त्याला कारणही तसेच घडले. चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित मार्गाच्या शोधात असताना प्रग्यान रोव्हरने स्वत:भोवती गिरकी घेतली. या हालचाली विक्रम लँडरमधील इमेजर कॅमेराने टिपल्या. त्या व्हिडीओबाबत इस्रोने लिहिलेल्या पोस्टला सर्वांनी दाद दिली आहे.

चांदोमामा, चांदोमामा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का असे गाणे आई आपल्या लहान मुलाला म्हणून दाखवते. आकाशात दिसणाऱ्या चांदोमामाचे प्रत्येकाला लहानपणापासून आकर्षण असते. त्या चांदोबावरील विक्रम लँडर, प्रग्यान रोव्हरच्या घडामोडींबद्दल इस्रो हलक्याफुलक्या शब्दांत एक्स प्लॅटफॉर्मवर लिहित असलेल्या पोस्ट सर्वांना आवडत आहेत. चंद्रावर ज्वालामुखी, उल्कापात किंवा आणखी कोणत्या कारणाने गंधक सापडत असावे याबाबत आता संशोधन करावे लागणार आहे. तसे इस्रोने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. (वृत्तसंस्था)

एपीएक्सएसलाही लागला गंधकाचा शोधप्रग्यान रोव्हरमधील अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपला (एपीएक्सएस) देखील चंद्राच्या पृष्ठभागावर गंधक व अन्य काही घटक आढळून आले. याआधी प्रग्यान रोव्हरमधील लेझर इन्ड्यूस्ड्  ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप (एलआयबीएस) या उपकरणाने चंद्रावरील गंधकाचा शोध लावला. 

रंभा-एलपी पेलोडने केले चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील प्लाझ्माचे मापन- विक्रम लँडरवरील रंभा-एलपी या पेलोडने चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर पृष्ठभागाजवळच्या प्लाझ्माचे पहिलेवहिले मापन केले. तेथील प्लाझ्मा हा तुलनेने विरळ असल्याचे या निरीक्षणांतून दिसून आले. - आयएलएसए पेलोडने केवळ प्रग्यान रोव्हर व अन्य पेलोडच्या हालचालींची नव्हे, तर चंद्रावरील एका नैसर्गिक घटनेची २६ ऑगस्ट रोजी नोंद केली आहे. रंभा-एलपी पेलोडने केलेली निरीक्षणे भावी चंद्रमोहिमांसाठी उपयोगी ठरणार आहेत.

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3