शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 14:31 IST

या प्रकरणात प्रज्वल रेवण्णा यांना जन्मठेप आणि ११.५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

कर्नाटकातील हसन येथील माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर ४७ वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाच्या तपासात एका साडीने महत्त्वाची भूमिका बजावली. ही साडी पीडितेची होती आणि ती गुन्ह्याच्या ठिकाणाहून जप्त करण्यात आली होती.

साडीने रेवण्णांना तुरुंगात कसे पाठवले?'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, बलात्कारानंतर प्रज्वलने पीडितेची साडी जबरदस्तीने काढून घेतली होती. त्यानंतर त्याने ती फार्महाऊसमधील एका खोलीमध्ये लपवून ठेवल्याचा आरोप आहे. तपासणीदरम्यान, पोलिसांनी पीडितेला घटनेच्या वेळी तिने काय परिधान केले होते, हे विचारले. तेव्हा तिने साडी नेसली असल्याचं सांगितलं आणि प्रज्वलने ती साडी परत न दिल्याने ती अजूनही फार्महाऊसवर असू शकते, अशी माहिती दिली.

या माहितीच्या आधारावर पोलिसांनी फार्महाऊसवर छापा टाकला आणि ती साडी जप्त केली. ही साडी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली. तपासणीत साडीवर वीर्य आढळून आलं आणि डीएनए चाचणीत ते प्रज्वलशी जुळत असल्याचं निष्पन्न झालं. यामुळे पीडितेच्या जबाबासोबतच ही साडी रेवण्णा यांना दोषी ठरवण्यासाठी एक महत्त्वाचा पुरावा ठरली.

शिक्षा सुनावल्यानंतर प्रज्वल तुरुंगात रडलेया प्रकरणात प्रज्वल रेवण्णा यांना जन्मठेप आणि ११.५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यातील ११.२५ लाख रुपये पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या चार प्रकरणांपैकी एका प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आलं. आता प्रज्वल यांनी या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्याची तयारी केली आहे.

विशेष म्हणजे, शिक्षा सुनावल्यानंतर तुरुंगातील पहिल्या रात्री प्रज्वल खूप दुःखी होते आणि ते रडले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. वैद्यकीय तपासणीदरम्यान ते रडत होते आणि त्यांनी कर्मचाऱ्यांसमोर आपलं दुःख व्यक्त केलं, असंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Karnatakकर्नाटकCrime Newsगुन्हेगारी