शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 12:29 IST

Sushil Kedia News: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला हिंदी सक्तीचा जीआर रद्द करण्यास भाग पाडल्यानंतर आज ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा मुंबईत होत आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने सुमारे २० वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला हिंदी सक्तीचा जीआर रद्द करण्यास भाग पाडल्यानंतर आज ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा मुंबईत होत आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने सुमारे २० वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले आहेत. दरम्यान, या सभेला सुरुवात होण्यापूर्वी मराठीत बोलणार नाही, काय करायचं ते करा, अशी धमकी देणाऱ्या सुशील केडिया यांना मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांनी दणका दिला आहे. महाराष्ट्रसैनिकांनी मुंबईमधील केडिया यांचं कार्यालय फोडलं.

मराठी आणि हिंदी असा वाद पेटल्यानंतर मीरारोड येथे एका परप्रांतीय दुकानदाराला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर सुशील केडिया यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट लिहून राज ठाकरेंना आव्हान दिलं होतं. त्यात ते म्हणाले की, मी गेल्या ३० वर्षांपासून मुंबईत राहत असूनही मला मराठी नीट येत नाही. आता, तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी असा निश्चय केला आहे की,  मी मराठी शिकणार नाही. मी अशी प्रतिज्ञा करतो. क्या करना है बोल? असं आव्हान त्यांनी दिलं होतं. त्यावरून वादाल तोंड फुटलं होतं.

मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकी देणं उद्योजक सुशील केडिया यांना चांगलंच महागात पडलं आहे. कार्यकर्त्यांनी मुंबईमधील केडिया यांच्या ऑफिसची तोडफोड केली. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी केडिया यांच्या ऑफिसवर दगड आणि नारळ फेकले. केडियांच्या ऑफिसबाहेर त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.   

टॅग्स :marathiमराठीMumbaiमुंबई