शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

'सत्य लपवता येत नाही, संभल आपलं तेच रुप दाखवत आहे'; योगी आदित्यनाथांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 10:21 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संभलमधील मुद्द्यावर भाष्य करताना एक विधान केलं आहे. संभलचे सत्य जाणून घ्यायचे असेल, तर आइन-ए-अकबरी वाचा, असा सल्ला त्यांनी टीकाकारांना दिला. 

Yogi Adityanath Sambhal News: संभलमधील जामा मशि‍दीचा मुद्दा देशभरात चर्चेत असून, याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना योगी आदित्यनाथ यांनी मोठं विधान केलं. 'संभल विष्णूचा दहावा अवतार श्री हरिंची भूमी आहे. पुराणांमध्ये याचा उल्लेख आहे. त्यामुळे हे सत्य पुराणांच्या आधारावर बघितलं पाहिजे', असे योगी आदित्यनाथ म्हणाले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "अबुल फजल यांनी त्यांच्या आइन-ए-अकबरी पुस्तकात ही गोष्ट सांगितली आहे. मीर बाकीने १५२६ मध्ये श्री हरि विष्णू मंदिर तोडले आणि मशि‍दीचा ढाचा उभा केला. त्यापूर्वी पुराणांमधील जो इतिहास आहे, ३५०० ते ५००० वर्षांचा जो कालखंड आहे. पहिले महापुराण श्रीमद भागवत पुराण आहे. त्यानंतर १८ महापुराण लिहिले गेले. अनेक पुराणांमध्ये याचा उल्लेख आहे की, विष्णूचा दहावा अवतार येईल आणि त्याची भूमी संभल असेल." 

अयोध्येतील राम मंदिर का तोडले?

योगी आदित्यनाथ म्हणाले, "मी विचारू इच्छितो की, मीर बाकीने १५२६ मध्ये संभल आणि १५२८ मध्ये अयोध्येत जिथे राम जन्मभूमि आहे. तिथले मंदिरं का तोडली? याचा अर्थ १६व्या शतका ते सगळ्यात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक होते. तिथे लोकांची श्रद्धा होती. तिथे जे पुरातत्व अवशेष मिळत आहे, जे पुरावे मिळत आहेत, ते हे सिद्ध करतात की, तिथे मंदिर पाडून नवी बांधकाम केले गेले", असा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला. 

सवंग लोकप्रियतेसाठी याचिका दाखल करणे चुकीचे -योगी आदित्यनाथ

'सनातन धर्म हाच भारताचा राष्ट्रीय धर्म आहे', असेही योगी आदित्यनाथ म्हणाले. 

संभलचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. योगी आदित्यनाथ या याचिकांबद्दल भाष्य करताना म्हणाले, "इस्लामचा उदय १४०० वर्षांचा इतिहास आहे. तर पुराणांचा इतिहास २००० वर्ष जुना आहे. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी योग्य म्हटलं की, सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी जो तो उठून एक जनहित याचिका दाखल करतोय. ही काय पद्धत आहे. ज्यात तथ्य आहे, ते मुद्दे तुम्ही मांडा", अशी भूमिका योगी आदित्यनाथ यांनी मांडली. 

"तुम्ही सत्य जास्त दिवस लपवू शकत नाही. सत्य एक ना एक दिवस समोर येतच आणि त्याचं योग्य ते रुप दाखवतं. संभल आता त्याचं तेच रुप दाखवत आहे", असे विधान योगी आदित्यनाथ यांनी संभलमधील वादावर केलं. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघReligious Placesधार्मिक स्थळे