शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

बदलीचा आदेश मला त्रास देण्यासाठी आला; न्यायमूर्ती प्रीतिंकर दिवाकर यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 04:56 IST

न्यायमूर्ती प्रीतिंकर दिवाकर यांचा मोठा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमने छत्तीसगडउच्च न्यायालयातून आपली अलाहाबाद उच्च न्यायालयात केलेली बदली चुकीच्या हेतूने करण्यात आली होती, असा धक्कादायक दावा अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मावळते मुख्य न्यायमूर्ती प्रीतिंकर दिवाकर यांनी केला आहे.

आपल्या निरोप समारंभात बोलताना न्यायमूर्ती दिवाकर यांनी माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली केल्याचा आरोप केला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान कॉलेजियमने या वर्षाच्या सुरुवातीला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी दिवाकर यांच्या नावाची शिफारस केली होती. १९८४ मध्ये न्यायमूर्ती दिवाकर यांची मध्य प्रदेशच्या बार कौन्सिलचे सदस्य म्हणून नावनोंदणी झाली. जानेवारी, २००५ मध्ये छत्तीसगड उच्च न्यायालयाने त्यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले होते. 

नेमके काय म्हणाले?माझ्या बदलीचा आदेश मला त्रास देण्याच्या वाईट हेतूने जारी करण्यात आला होता असे दिसते, परंतु सुदैवाने मला माझ्या साथीदार न्यायाधीश आणि बारच्या सदस्यांकडून प्रचंड पाठिंबा मिळाला, आपल्यावर झालेला अन्याय दुरुस्त केल्याबद्दल मी वर्तमान सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे आभार मानतो,’ असेही ते म्हणाले.

असा झाला प्रवास...छत्तीसगड उच्च न्यायालयात साडेआठ वर्षांच्या कार्यकाळानंतर ३ ऑक्टोबर, २०१८ रोजी त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली झाली. त्यानंतर, या वर्षी १३ फेब्रुवारी रोजी त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर, २६ मार्च रोजी ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTransferबदलीChhattisgarhछत्तीसगड