शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सात राज्यांमध्ये राज्यपाल बदलणार?; हालचालींना वेग, मंत्रिमंडळात फेरबदलाचीही चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 09:16 IST

 पाच राज्यपाल आणि दोन नायब राज्यपाल यांचा कार्यकाळ लवकरच समाप्त होणार आहे.

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली- राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुका आणि स्वातंत्र्य दिन समारंभ पार पडल्यानंतर आता राज्यपाल बदलांबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. मंत्रिमंडळात फेरबदलाचीही चर्चा आहे. मात्र पक्ष त्यासाठी आणखी वेळ घेऊ शकतो. पाच राज्यपाल आणि दोन नायब राज्यपाल यांचा कार्यकाळ लवकरच समाप्त होणार आहे. ज्येष्ठ नेत्यांना राज्यपाल आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना नायब राज्यपाल म्हणून नियुक्त करण्याला पंतप्रधान पसंती देतात. 

अलीकडेच व्ही.के.सक्सेना यांची दिल्लीत नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. ज्या नावांचा सध्या विचार केला जात आहे, त्यात माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचा समावेश आहे. राज्यपालांच्या यादीत प्रथम क्रमांकावर नाव आहे सत्यपाल मलिक यांचे. ते सध्या मेघालयात आहे. त्यांना गोव्यातून मेघालयात पाठवण्यात आले आङे. तेव्हापासून ते दिल्लीतील मेघालय भवनमध्येच आहेत. त्यांना ऑक्टोबर २०१७मध्ये बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले होते. त्यांना जम्मू-काश्मिरातही पाठविण्यात आले होते. इतिहासातील ते असे एकमेव राज्यपाल आहेत, जे सातत्याने केंद्र सरकारविरुद्ध जाहीर भाष्य करीत आलेले आहेत. तरीही पंतप्रधानांनी त्यांना बडतर्फ केले नाही. 

अरुणाचलचे बी.डी.मिश्रा, आसाम व नागालँडचे जगदीश मुखी, पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदाची जबाबदारी असलेल्या तमिलसाई सुंदरराजन आणि अंदमान-निकोबारचे डी.के. जोशी यांचा कार्यकाळ समाप्त होत आहे. बनवारीलाल पुरोहित यांना ऑक्टोबर २०१७मध्ये तामिळनाडूचे राज्यपाल करण्यात आले आणि नंतर पंजाबला स्थलांतरित करण्यात आले. त्यांना कायम ठेवले जाऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा