शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

कोलकाता बलात्कार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल, मंगळवारी होणार सुनावणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 17:19 IST

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठात सुनावणी होणार आहे.

Supreme Court West Bengal Rape Case :पश्चिम बंगालमधील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाने देशभरात संतापाची लाट आहे. या घटनेविरोधात देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांचे विद्यार्थीही आंदोलन करत आहेत. दरम्यान, आता या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली असून, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती जेबी पराडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठात मंगळवारी (20 ऑगस्ट 2024) सुनावणी होणार आहे.

प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टवर पाशवी अत्याचाराच्या घटनेने देशातील राजकारण तापले आहे. तसेच, देशभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय महिविद्यालयांचे विद्यार्थी याविरोधात आंदोलन करत आहेत. दरम्यान, 17 ऑगस्ट रोजी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सरन्यायाधीशांना पाठवलेल्या या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेण्याची विनंती करण्यात आली होती.

9 ऑगस्ट रोजी सापडला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता आरजी कार हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळला होता. यानंतर पोलीस दहाच्या सुमारास घटनास्थळी आले. पीडितेच्या अंगावर अनेक जखमांच्या खुणा होत्या. सुरुवातीला रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी याला आत्महत्या असल्याचे म्हटले होते, परंतु नंतर पोस्टमॉर्टम अहवालात बलात्कार करून हत्या केल्याचे समोर आले.

यानंतर कोलकाता पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपी संजय रायय याला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्हा मान्य केला. पुढे हे प्रकरण कलकत्ता उच्च न्यायालयात पोहोचले. कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले. या प्रकरणी सीबीआयने आतापर्यंत सुमारे 20 जणांची चौकशी केली आहे. सीबीआयच्या टीमने आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये आणि बाहेर 3D लेझर मॅपिंगची तपासणी केली आहे. दरम्यान, पीडितेला न्याय मिळावा, या मागणीसाठी देशभरातील विविध भागात निदर्शने होत आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयwest bengalपश्चिम बंगाल