शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांने जानवे काढले नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 10:31 IST

१७ एप्रिल रोजी बिदर येथील साई स्फुर्ती पीयू कॉलेजमध्ये कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट (CET) देण्यासाठी गेल्यावर सुचिव्रत कुलकर्णी या विद्यार्थ्याला जानवे काढण्यास सांगितले, तो काढला नाही म्हणून परिक्षेला बसू दिले नाही, असा आरोप केला होता.

कर्नाटकातील एका विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी जानवे काढण्यास सांगण्यात आले. १७ एप्रिल रोजी बिदर येथील साई स्फुर्ती पीयू कॉलेजमध्ये कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट (CET) देण्यासाठी गेल्यावर सुचिव्रत कुलकर्णी या विद्यार्थ्याने त्याचे जानवे काढण्यास सांगितले होते, तो काढला नाही म्हणून परीक्षेला बसू दिले नाही, असा आरोप केला आहे.

वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...

विद्यार्थ्याने सांगितले की, परीक्षा केंद्रावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याला सांगितले की जर त्याने जानवे काढले नाही तर त्याला परीक्षेला बसू दिले जाणार नाही. विद्यार्थ्याने जानवे धार्मिक प्रतीक असल्याचे सांगून तो काढण्यास नकार दिल्यानंतर त्याला परीक्षेला बसण्यापासून रोखण्यात आले. दरम्यान, आता या प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

विद्यार्थ्याला परीक्षेला बसण्यापासून रोखल्याबद्दल साई स्पृती पीयू कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर बिरादार आणि कर्मचारी सतीश पवार यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

विद्यार्थी सुचिव्रत कुलकर्णीची आई नीता कुलकर्णी यांनीही या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, माझ्या मुलाने सांगितले होते की, तो जानवे काढू शकत नाही कारण ते धार्मिक श्रद्धेशी संबंधित आहे. तरीही, त्याला परीक्षेतून काढून टाकण्यात आले. हे खूप चुकीचे होते.

आईची मोठी मागणी

विद्यार्थ्याच्या आईने सरकारकडे मागणी केली होती की तिच्या मुलाची पुनर्परीक्षा घ्यावी किंवा त्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश द्यावा आणि त्याची फी सरकार किंवा संबंधित महाविद्यालयाने भरावी.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा