शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनी आणि प्राध्यापिका १५ फूट खड्ड्यात उतरल्या, तेवढ्यात वरून कोसळली माती, विद्यार्थिनीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 15:39 IST

Gujarat News: गुजरातमधील ऐतिहासिक लोथल येथील पुरातत्विय साईटवर एक दु:खद घटना घडली आहे. येथे संशोधन साईटवर झालेल्या भूस्खलनामध्ये एक विद्यार्थिनी आणि प्राध्यापिका मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या.

गुजरातमधील ऐतिहासिक लोथल येथील पुरातत्विय साईटवर एक दु:खद घटना घडली आहे. येथे संशोधन साईटवर झालेल्या भूस्खलनामध्ये एक विद्यार्थिनी आणि प्राध्यापिका मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या. मिळालेल्या माहितीनुसार प्राध्यापिका यामा दीक्षित आणि पीएचडी स्टुडंट सुरभी वर्मा नमुने घेण्यासाठी खड्ड्यात उतरल्या होत्या. मात्र अचानक माती कोसळली. त्यात या दोघीही ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या. या दुर्घटनेत सुरभी वर्मा यांचा मृत्यू झाला. तर प्राध्यापिका यामा दीक्षित यांना वाचवण्यात यश आलं आहे.  यामा यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही शास्त्रज्ञ लोथल येथे मातीचे नमुने घेण्यासाठी गेले होते.

दिल्ली आणि गांधीनगर येथून एक टीम धोलका येथील हडप्पा संस्कृतीमधील स्थळ असेलल्या लोथल येथे संशोधनासाठी आली होती. दरम्यान, यामा दीक्षित आणि सुरभी वर्मा ह्या मातीचे नमुने मिळवण्याासाठी १५ फूट खोल खड्ड्यात उतरल्या. याचदरम्यान, मातीचा ढिगारा वरून त्यांच्यावर कोसळला. त्यात त्या गाडल्या गेल्या. या दुर्घटनेत सुरभी वर्मा यांचा मृत्यू झाला. तर यामा दीक्षित यांना वाचवण्यात यश आलं.

मिळालेल्या माहितीनुसार लोथल येथे दिल्लीतील एक सहाय्यक प्राध्यापिका आणि एक विद्यार्थिनी नमुने घेण्यासाठी आले होते.  मागच्या तीन दिवसांपासून ते वेगवेगळ्या परिसरांमधून नमुने गोळा करत होते. आज सकाळीही त्यांच्याकडून लोथल येथील एका ठिकाणी १५ फूट खोल खड्डा खोदून त्यामधून मातीचे नमुने घेण्याचं काम सुरू होतं. मात्र त्याच वेळी मातीचा मोठा ढिगारा अचानक कोसळला. त्यात सुरभी वर्मा यांचा मृत्यू झाला. तर प्राध्यापिका यामा दीक्षित या किरकोळ जखमी झाल्या.   

टॅग्स :Gujaratगुजरात