शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Bharat Jodo Yatra : 'काश्मीरमधील स्थिती चांगली, तर लाल चौकात पायी का जात नाही'? राहुल गांधींच अमित शाहंना खुलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 23:52 IST

चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादावरूनही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले.

काँग्रेसचीभारत जोडो यात्रा रविवारी श्रीनगर येथे पोहोचली आहे. येथे यात्रेचे संयोजक राहुल गांधी यांनी तिरंगा ध्वज फडकावला. यानंतर, पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी राहुल गांधी यांनी गृह मंत्री अमित शाह यांना खुले आव्हान दिले.  ते म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग आणि ब्लास्ट होत आहेत. जर सुरक्षा व्यवस्था एवढी चांगली असेल, तर भाजप, लाल चौकातून जम्मूपर्यंत यात्रा का करत नाही. गृह मंत्री अमित शाह जम्मू ते काश्मीरपर्यंत पदयात्रा का करत नाहीत? येथील सुरक्षा व्यवस्था ठीक आहे, असे मला वाटत नाही.

चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादावरूनही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. राहुल गांधी म्हणाले की, मी निवृत्त सैनिक आणि लडाखमधील जनतेची भेट घेतली. ते म्हणाले की चीनने आपली 2000 चौरस किमी जमीन घेतली आहे. भारतातील अनेक पेट्रोलियम केंद्रांवरही चीनने ताबा घेतला आहे. सरकारने या गोष्टी नाकारणे अत्यंत धोकादायक आहे. यामुळे चीनचे मनोबल आणखी वाढेल.

यावेळी राहुल गांधींनी विरोधकांच्या एक्यासंदर्भातही भाष्य केले. विरोधी पक्षांमध्ये जी एकता येते, ती बोलण्यातून येते. विरोधक विखुरले आहेत असे म्हणणे योग्य नाही. विरोधकांमध्ये मतभेद नक्कीच आहेत, पण विरोधक एकत्र लढतील. ही विचारधारेची लढाई आहे. एका बाजूला आरएसएस-भाजप आहे, तर दुसऱ्या बाजूला बिगर आरएसएस-भाजपवाले आहेत, असेही राहुल यांनी म्हटले आहे.

यात्रा येथेच संपत नाही, ही तर सुरुवात - यावेळी राहुल गांधी यांनी 'भारत जोडो' यात्रेसंदर्भातील आपले अनुभवही सांगितले. ते म्हणाले, या यात्रेचा भारतीय राजकारणावर प्रभाव पडेल, पण  हा काय असेल हे मी सांगू शकत नाही. ते म्हणाले, या यात्रेतून बरेच काही शिकायला मिळाले. लोकांना एकत्र आणणे आणि द्वेष संपवणे, असा या यात्रेचा उद्देश होता. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. एवढेच नाही तर हा माझ्या आयुष्यातील सर्वात सर्वोत्तम अनुभव आहे. यात्रा येथेच संपत नाही, तर हे पहिले पाऊल आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीरSrinagarश्रीनगर