शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

पंतप्रधानांच्या उत्तराने अधिवेशनाची सांगता, उत्तर ठरवेल निवडणुकीचा अजेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 10:15 IST

लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत सरकारकडून अविश्वास प्रस्तावावरील चर्चेची तारीख ८, ९ ऑगस्टला निश्चित करण्यात आली.

संजय शर्मा -

नवी दिल्ली : संसदेत केंद्र सरकारविरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी १० ऑगस्ट रोजी उत्तर देणार आहेत. या उत्तराने संसदेचे पावसाळी अधिवेशन संपणार आहे. मात्र, त्याआधी पंतप्रधान मोदी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांचा अजेंडा ठरवणार आहेत.   

लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत सरकारकडून अविश्वास प्रस्तावावरील चर्चेची तारीख ८, ९ ऑगस्टला निश्चित करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून १० ऑगस्ट रोजी या चर्चेला उत्तर दिले जाईल, असे सांगण्यात येत आहे. याआधी या आठवड्याच्या अखेरीस अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराने सरकारला संसदेचे अधिवेशन संपवायचे आहे. विशेष म्हणजे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी ११ ऑगस्टपर्यंत निश्चित करण्यात आला होता. मात्र, आता पंतप्रधान मोदींच्या भाषणानेच संसदेचे अधिवेशन १० ऑगस्टला संपू शकते.   

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडे केवळ मध्य प्रदेश राज्य आहे. तर, छत्तीसगढ आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. तेलंगणात बीआरएसचे सरकार आहे. त्यामुळे पंतप्रधानांकडे बोलण्यासारखे खूप काही असेल. विरोधकही डावपेच आखत आहेत. आपले म्हणणे मांडून पंतप्रधानांचे उत्तर न ऐकता वॉक आऊट करणे आणि पंतप्रधानांच्या प्रत्युत्तरात गदारोळ करणे, बोलण्यात अडथळा निर्माण करणे, असे पर्याय विरोधकांकडे आहेत.

विरोधकांच्या हल्ल्याला उत्तर आणि...अविश्वास प्रस्तावावरील चर्चा ८ ऑगस्टला सुरू होईल आणि १० ऑगस्टला संपेल. पंतप्रधानांच्या भाषणात मणिपूरवरील विरोधकांच्या हल्ल्याला उत्तर तर दिले जाईलच. पण, राजस्थान, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारावरही ते भाष्य करतील. नोव्हेंबरमध्ये राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींना या राज्य सरकारांवर हल्लाबोल करण्याची संधी मिळाली आहे. दारू घोटाळ्यासाठी छत्तीसगड सरकारवर ठपका ठेवण्यात आला आहे. तर, राजस्थान सरकारच्या लाल डायरीची सर्वत्र चर्चा सुरू आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदlok sabhaलोकसभा