शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Crime: वाळू माफियांनी खाण इन्स्पेक्टरसह जवानांवर टाकलं पेट्रोल, जिवंत जाळणार तेवढ्यात... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 10:09 IST

Crime News: वाळू माफियांनी खाण इन्स्पेक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांवर पेट्रोल टाकले आणि त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हे अधिकारी जीव वाचवून कसेबसे तिथून सटकले.

बिहारमधील छपरा जिल्ह्यात वाळूमाफियांनी खाण इन्स्पेक्टरला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. खाण इन्स्पेक्टर काल रात्री सोनपूरजवळ बेकायदेशीर वाळू वाहतुकीची तपासणी करत होते. त्यावेळी त्यांनी एक ट्रक पकडला. मात्र तेवढ्यात बोलेरोमधून वाळू माफिया तिथे पोहोचले. त्यांनी अचानक हल्ला केला. यादरम्यान, एक सॅप जवान जखमी झाला. त्यानंतर या वाळू माफियांनी खाण इन्स्पेक्टर अंजनी कुमार आणि इतर कर्मचाऱ्यांवर पेट्रोल टाकले आणि त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हे अधिकारी जीव वाचवून कसेबसे तिथून सटकले.

यादरम्यान, वाळू माफिया ट्रक घेऊन फरार झाले. याप्रकरणी सोनपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री सोनपूरच्या शिव बचन सिंह चौकाजवळ सारणचे खाण निरीक्षक अंजनी कुमार यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न खाण माफियांनी केला. या प्रकरणी खाण निरीक्षक अंजनी कुमार यांनी सोनपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

या तक्रारीत त्यांनी सांगितले की, मी शिवबचन सिंह चौकात चेकपोस्ट जवळ वाहनांची तपासणी करत होते. यादरम्यान, एक दहा चाकी ट्रक थांबवला. पोलिसांना पाहताच ट्रकचालक ट्रक सोडून पळाला. तपास केला असता ट्रकमध्ये ओव्हरलोड वाळू भरलेली असल्याचे आढळले. त्यानंतर ट्रकवर जप्तीची कारवाई करण्यात येत असताना बोलेरोमधून पाच जण तिथे पोहोचले. त्यांनी  ट्रकची चावी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा खाण निरीक्षकही तिथे पोहोचले.

त्यांना पाहताच वाळू माफियांनी सॅप जवानांवर आणि वाळू माफियांवर लाठ्या काठ्या मारण्यास सुरुवात केली. त्यात एक जवान जखमी झाला. तेवढ्यात वाळू माफियांनी खाण निरीक्षक आणि त्यांच्या गाडीवर पेट्रोल टाकूनी पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र खाण निरीक्षकांनी प्रसंगावधान राखत तिथून काढता पाय घेतला आणि जीव वाचवला.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार