शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

संपत्ती, मालमत्तेचा ‘हक्क’ घटनात्मक अधिकार; पुरेशी नुकसानभरपाई हवीच - सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 09:19 IST

...बंगळुरू-म्हैसूर इंफ्रास्ट्रक्चर कॉरिडोर प्रोजक्टशी (बीएमआयसीपी) संबंधित एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने हे मत व्यक्त केले.

नवी दिल्ली : संपत्तीचा किंवा मालमत्तेचा हक्क हा घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे कायद्यानुसार पुरेशी नुकसानभरपाई दिल्याशिवाय एखाद्याची मालमत्ता घेता येऊ शकत नसल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. बंगळुरू-म्हैसूर इंफ्रास्ट्रक्चर कॉरिडोर प्रोजक्टशी (बीएमआयसीपी) संबंधित एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने हे मत व्यक्त केले.

संविधान (४४ व्या घटनादुरुस्ती) कायदा-१९७८ मुळे संपत्तीचा मूलभूत अधिकार संपुष्टात आला आहे. असे असले, तरी तो कायदा एका कल्याणकारी राज्यात मानवाधिकार व संविधानाच्या कलम ३००-अ अंतर्गत एक संवैधानिक अधिकार बनल्याचे न्यायमूर्ती बी. आर. गवई व न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. त्यामुळे घटनेतील कलम ३००-अ च्या तरतुदीतील कायदेशीर प्रक्रियेचा वापर न करता कोणत्याही व्यक्तीला त्याच्या संपत्तीतून बेदखल केले जाऊ शकत नाही. या कायद्यामुळे संपत्तीचा अधिकार आता मूलभूत अधिकार राहिला नसून, तो संवैधानिक अधिकार झाला आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला पुरेशी भरपाई दिल्याशिवाय त्याची मालमत्ता घेतली जाऊ शकत नाही. कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास महामंडळाने जानेवारी २००३ मध्ये एका प्रकल्पाशी निगडीत जमीन अधिगृहणाची प्राथमिक अधिसूचना काढली होती. त्यानंतर नोव्हेंबर २००५ मध्ये याचिकाकर्त्याच्या जमिनीवर ताबा मिळवण्यात आला. कोणतीही नुकसानभरपाई न देता मालमत्तेवर ताबा मिळवल्याबद्दल जमीन मालकाला गत २२ वर्षांत अनेक वेळा न्यायालयात धाव घ्यावी लागल्याचे यावेळी खंडपीठाने स्पष्ट केले.

न्यायालयाकडून विशेष अधिकाराचा वापर- अवमानप्रकरणी नोटीस पाठवल्यानंतर विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी २२ एप्रिल २०१९ रोजी अधिगृहीत जमिनीचा बाजारभाव ठरवण्यासाठी २०११ चे दिशानिर्देश लक्षात घेत जमिनीची किंमत निश्चित केली होती. - त्यामुळे २००३ च्या बाजार भावाप्रमाणे लोकांना नुकसानभरपाई देण्याची परवानगी दिली, तर ते न्यायाची थट्टा करण्यासारखे व घटनात्मक अधिकाराची चेष्टा केल्यासारखे होईल, असे नमूद करत खंडपीठाने मिळालेल्या शक्तींचा वापर करत २२ एप्रिल १०१९ च्या बाजारभावाप्रमाणे लोकांना नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय