शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुरी येथील जगन्नाथ मंदिरातील खजिना गेला चोरीस? रत्न भंडाराच्या नकली चाव्यांचं गुढ वाढलं   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 14:51 IST

Ratna Bhandar of Jagannath Mandir: ओदिशामधील पुरी येथे असलेल्या जगन्नाथ मंदिराच्या रत्न भंडारातून मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या रत्न भंडाराची देखभाल करण्यासाठी सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या एका सदस्याने याबाबत सनसनाटी दावा केला आहे.

ओदिशामधील पुरी येथे असलेल्या जगन्नाथ मंदिराच्या रत्न भंडारातून मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या रत्न भंडाराची देखभाल करण्यासाठी सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या एका सदस्याने याबाबत सनसनाटी दावा केला आहे. मौल्यवान वस्तूंची चोरी करण्यासाठी नकली चाव्यांचा वापर केला जात होता, असा दावा त्यांनी केला.  

या समितीचे अध्यक्ष विश्वनाथ रथ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पुरी येथे एक बैठक झाली, त्यानंतर समितीचे सदस्य जगदीश मोहंती यांनी हा सनसनाटी आरोप केला. याबाबत प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार  मोहंती यांनी बैठकीनंतर सांगितले की, नकली चाव्या वापरून कुलूप न उघडल्याने ताळे तोडण्यात आले. त्यामुळे किमती वस्तू चोरण्याच्या हेतूने हे कृत्य करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. बनावट चावीचा मुद्दा एक बनाव होता, कारण चोरीच्या प्रयत्नाची शक्यता नाकारता येत नाही. 

२०१८ मध्ये पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या रत्न भंडाराच्या खऱ्या चाव्या गायब झाल्या होत्या. त्यानंतर पुरीच्या प्रशासनाने दोन बनावट चाव्या बनवल्या होत्या. मात्र १४ जुलै रोजी जेव्हा रत्न भंडार उघडण्याचा  प्रयत्न केला गेला. तेव्हा या चाव्या कुलपांना लागल्या नाहीत. त्यानंतर समितीच्या सदस्यांना रत्न भंडारात जाण्यासाठी तेथील दरवाजांना लावलेले कुलूप तोडावे लागले.

निवृत्त आयएएस अधिकारी असलेल्या मोहंती यांनी सांगितले की, त्यांनी बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित केल होता. मात्र समितीला सरकारकडे याबाबत तपास सुरू करण्याची शिफारस करण्याचा अधिकार नाही आहे. मंदिर प्रशासन आम्हाला आलेल्या संशयाबाबत सरकारला माहिती देऊ शकतो. त्यांनी पुढे सांगितले की, १४ जुलै रोजी रत्न भंडाराच्या अंतर्गत कक्षातील काही खोके उघडलेले आढळून आले होते. तसेच या कक्षामध्ये लाकडाची तीन कपाटं, एक स्टिलचं कपाट, लाकडाच्या दोन पेट्या आणि एक लोखंडी पेटी होती. मंदिर प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ लाकडाचं एक कपाटच बंद असल्याचं दिसून आलं.  

टॅग्स :OdishaओदिशाIndiaभारत