शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जानेवारी २०२४ मध्ये खुले होणार राम मंदिर, ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 06:17 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील शनिवारी ज्या ठिकाणाहून मंदिर उभारणीच्या कामाचा आढावा घेतला होता त्या ठिकाणीही पत्रकारांना नेण्यात आले. 

अयोध्या : अयोध्येतील भगवान राम मंदिर जानेवारी २०२४ मध्ये मकरसंक्रांतीला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. मंदिराची उभारणी करणाऱ्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले की, मुख्य मंदिराचे ४० टक्के आणि एकूण परिसराचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. मंदिर उभारणीतील प्रगती आणि गुणवत्ता याबाबत आम्ही समाधानी आहोत.

ते म्हणाले की, मंदिराचा तळमजला डिसेंबर २०२३ पर्यंत तयार होईल. त्यानंतर १४ जानेवारी २०२४ रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी मंदिरात भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल आणि मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येईल. मंदिर उभारणीचे काम पाहता येईल अशा ठिकाणी मीडियाला जाण्याची परवानगी मंगळवारी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील शनिवारी ज्या ठिकाणाहून मंदिर उभारणीच्या कामाचा आढावा घेतला होता त्या ठिकाणीही पत्रकारांना नेण्यात आले. 

१,८०० कोटींचा खर्च राय यांनी सांगितले की, मंदिर उभारणीसाठी १८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मंदिर परिसरात प्रमुख साधू, संत यांच्या मूर्तींसाठी जागा तयार करण्यात येईल. या योजनेंतर्गत मंदिर परिसरात ७० एकर भागात वाल्मिकी, केवट, शबरी, जटायू, सीता, विघ्नेश्वर आणि शेषावतार (लक्ष्मण) यांची मंदिरेही उभारण्यात येणार आहेत. राजस्थानातील मकराना येथून पांढरे संगमरवर आणले जात असून मंदिराच्या गर्भगृहात त्यांचा उपयोग केला जाईल.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदी