शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

राहुलना शिक्षा देणाऱ्या जजची पदोन्नती रोखली; गुजरातचे आणखी ६७ न्यायाधीश यादीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 09:11 IST

वर्मा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा दिली होती.

नवी दिल्ली : सुरतचे मुख्य न्यायदंडाधिकारी (सीजेएम) हरीश हसमुखभाई वर्मा यांच्यासह गुजरातमधील कनिष्ठ न्यायालयातील ६८ न्यायिक अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. वर्मा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा दिली होती.

न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि न्यायमूर्ती सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठाने निरीक्षण नोंदवले केले की, गुजरात राज्य न्यायिक सेवा नियम २००५ नुसार, पदोन्नती ही गुणवत्ता, सह-ज्येष्ठता सिद्धांत आणि पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच व्हायला हवी. २०११ मध्ये नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली होती.

उच्च न्यायालयाने जारी केलेली यादी आणि जिल्हा न्यायाधीशांच्या पदोन्नतीसाठी राज्य सरकारने दिलेले आदेश बेकायदेशीर आणि या न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात आहेत, असे खंडपीठाने म्हटले आहे. त्यामुळे ही यादी कायम ठेवता येणार नाही.  न्यायालयाने म्हटले, ‘आम्ही पदोन्नती यादीच्या अंमलबजावणीवर बंदी घालतो. पदोन्नती मिळालेल्या संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ पदावर परत पाठवले जाते, ज्यात त्यांची पदोन्नतीपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती.’

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी