शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापक कोर्टात गेले; थेट कामावरूनच काढले, निलंबनावरून सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 09:55 IST

खंडपीठाने वेंकटरामानी यांना जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांशी बोलून या प्रकरणी लक्ष घालण्यास सांगितले.

नवी दिल्ली : कलम ३७० रद्द करण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या शिक्षण विभागातील एका प्राध्यापकाला कशासाठी निलंबित केले, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी ॲटर्नी जनरल आर वेंकटरामानी आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना विचारून निलंबनावर लक्ष देण्यास सांगितले. 

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने या खटल्यातील याचिकाकर्ता म्हणून २४ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात निवेदन केलेल्या जहूर अहमद भट यांच्या निलंबनाची दखल घेतली. न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांचाही या खंडपीठात समावेश होता.

खंडपीठाने वेंकटरामानी यांना जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांशी बोलून या प्रकरणी लक्ष घालण्यास सांगितले. यावर व्यंकटरामानी यांनी आपण याप्रकरणी लक्ष घालू असे उत्तर दिले. मेहता म्हणाले की, प्राध्यापकाच्या निलंबनामागे अनेक कारणे आहेत, ज्यात विविध न्यायालयांमध्ये दररोज याचिका दाखल करणे यासह अनेक कारणे असल्याचे सांगण्यात आले. 

‘अशा पद्धतीने लोकशाही चालवू नका’- त्यावर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले की, मग त्यांना आधी निलंबित करायला हवे होते, आता का? माझ्याकडे भट यांचा निलंबनाचा आदेश असून त्यांनी या न्यायालयासमोर युक्तिवाद केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. हे योग्य नाही. अशा पद्धतीने लोकशाही चालवता कामा नये. - मेहता म्हणाले की, निलंबनाची वेळ योग्य नाही असे मला वाटते आणि ते त्याकडे लक्ष देतील. एका अधिकृत आदेशानुसार, वरिष्ठ प्रा. जहूर अहमद भट यांची त्यांच्या पोस्टिंगच्या जागेवरून श्रीनगर येथे बदली करण्यात आली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय