शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सीबीडीटीच्या अध्यक्षांना मिळू शकते मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 11:26 IST

सीबीडीटीचे अध्यक्ष जे. बी. मोहापात्रा ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत असून, त्यांना मुदतवाढ मिळू शकेल.

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली : केंद्र सरकार सध्या काही अधिकाऱ्यांना मुदतवाढ देत असून, याचा लाभ केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) अध्यक्षांना मिळू शकेल. केंद्रीय गृह सचिव आणि गुप्तचर विभाग आणि रिसर्च अँड ॲनालिसीस विंगच्या (रॉ) प्रमुखांनी दोन वर्षांची निश्चित अशी सेवा पूर्ण केल्यानंतरही त्यांना आणखी एका वर्षाची मुदतवाढ दिली गेली. मंत्रिमंडळ सचिवालाही मुदतवाढ दिली गेली होती आणि सक्तवसुली संचालक संजय मिश्रा यांना तर चार वर्षांपेक्षा जास्त मुदतीची कारकीर्द मिळाली. 

सीबीडीटीचे अध्यक्ष जे. बी. मोहापात्रा ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत असून, त्यांना मुदतवाढ मिळू शकेल. ते १९८५ च्या भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आहेत. या आधीही सीबीडीटीच्या अध्यक्षांना त्यांच्या निवृत्तीच्या आधीही मुदतवाढी मिळाल्या असल्यामुळे यात नवीन असे काही नाही.  जे. बी. मोहापात्रा यांच्या आधीचे अध्यक्ष सुशील चंद्र आणि पी. सी. मोदी हे सेवानिवृत्तीनंतरही कंत्राटी तत्त्वावर अध्यक्षपदी कायम राखले गेले होते. आयकर विभागाच्या संपूर्ण देशभर ज्या संवेदनशील कारवाया सुरू असतात त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची सरकारला गरज वाटते म्हणून अधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळते. सेवेत मुदतवाढ मिळाल्यानंतर सुशील चंद्र यांची नियुक्ती निवडणूक आयुक्त म्हणून झाली होती आणि आता ते मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. त्याचप्रमाणे डॉ. पी. सी. मोदी हे राज्यसभेचे महासचिव आहेत.

नियमांत दुरुस्त्या१. सरकारने विशिष्ट महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना दोन वर्षांपर्यत मुदतवाढ दिली जाऊ शकते, असे म्हणून काहीच दिवसांपूर्वी सगळ्या सेवांतील मूलभूत नियमांत दुरुस्त्या केल्या. २. मूलभूत नियम, १९९२ हा सर्वसमावेशक नियमांचा संच असून तो सर्व नागरी सरकारी सेवांना लागू होतो. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारGovernmentसरकार