तंत्रज्ञानाबाबत उदासीनतेमुळे गरिबांनी सोसला सर्वाधिक त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 11:44 AM2022-05-28T11:44:02+5:302022-05-28T11:44:47+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी : दोनदिवसीय भारत ड्रोन महोत्सवाचे उद्घाटन

The poor suffer the most because of the apathy towards technology | तंत्रज्ञानाबाबत उदासीनतेमुळे गरिबांनी सोसला सर्वाधिक त्रास

तंत्रज्ञानाबाबत उदासीनतेमुळे गरिबांनी सोसला सर्वाधिक त्रास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :   २०१४ पूर्वी शासनात तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याबाबत उदासीनता होती; त्यामुळे  गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना सर्वाधिक त्रास सोसावा लागला. विद्यमान सरकारने ड्रोनसह अन्य तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सेवा शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

देशातील  सर्वांत मोठ्या ‘भारत ड्रोन महोत्सवा’च्या उद्घाटनानंतर ते बोलत होते.  ते म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असताना माझे असे स्वप्न आहे की, प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असावा. प्रत्येक शेतात एक ड्रोन आणि प्रत्येक घरात समृद्धी असावी. भारतात ड्रोन तंत्रज्ञानाबाबत असलेला उत्साह अद्भुत आहे. हे उदयोन्मुख क्षेत्रात रोजगार निर्मितीचे संकेत देते. एक काळ असा होता की, लोकांना रेशन घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहायचे. गेल्या सात ते आठ वर्षांत ही समस्या तंत्रज्ञानाच्या मदतीने दूर करण्यात आली.  पूर्वी असा समज होता की, तंत्रज्ञान आविष्कारांवर उच्चभ्रू लोकांचाच अधिकार आहे; परंतु,  आज आम्ही  हे सुनिश्चित करीत आहोत की,  कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाचा लाभार्थी सर्वांत आधी जनताच व्हावी. ड्रोन तंत्रज्ञान याचे उदाहरण आहे.
राजधानी दिल्लीत २७ मेपासून दोन दिवस भारत ड्रोन महोत्सव (२०२२) आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन समारंभाला केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव आणि ग्रामविकास मंत्री गिरिराज सिंह उपस्थित होते.

या क्षेत्रात होणार ड्रोनची मदत
कृषी, क्रीडा, संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांत ड्रोनचा वापर वाढेल. कुंभमेळा किंवा इतर माेठ्या आयाेजनांच्यावेळी ड्राेनची खूप मदत हाेणार आहे. तसेच वाहतूक काेंडी झाल्यावरही ड्राेनची मदत घेता येईल, असे पंतप्रधान माेदी म्हणाले.

Web Title: The poor suffer the most because of the apathy towards technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.