शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Air India: प्रवेश नाकारल्याने विमान ‘मिस’ झाले, महिलेला ‘पॅनिक अटॅक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 05:48 IST

नवी दिल्लीतील घटना : व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी प्रवेश नाकारल्याने एका मध्यमवर्गीय महिलेला ‘पॅनिक अटॅक’ आला आणि ती बोर्डिंग गेटसमोरच जमिनीवर पडली. गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी बोर्डिंग गेटमधून प्रवेश करू न दिल्याने घाबरल्यामुळे महिलेसोबत ही घटना घडली, असा आरोप या महिलेच्या नातेवाईकाने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये केला आहे. 

वैद्यकीय मदत नाही, उलट विमानतळावरुन जाण्यास सांगितलेमहिला आणि तिच्यासोबत असलेल्या दोन प्रवाशांना विमानतळावर सिक्युरिटी गेटमधून चेक-इन करताना काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी आधीच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांकडे वेळेत चेक-इन करण्यासाठी मदत मागितली. पण, ते आमचं काम नाही असं म्हणत कर्मचाऱ्यांनी नकार दिला. अखेरीस चेक-इन केल्यानंतर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांशी पुन्हा संपर्क साधून आमच्या सोबत हृदय आणि मधुमेहाची रुग्ण असलेली महिला आहे, त्यामुळे आम्हाला बोर्डिंग गेटपर्यंत पोहोचण्यास ५ मिनिटे लागतील असे कळवले. पण तरीही बोर्डिंग गेट बंद करण्यात आला आणि आम्हाला प्रवेश नाकारला. महिलेच्या मुलाची त्याच दिवशी अंतिम परीक्षा होती, त्याबाबत विचार करुन त्यांना पॅनिट अटॅक आला आणि त्या बेशुद्ध झाल्या. शिवाय वैद्यकीय मदत देण्याऐवजी विमानतळावरून निघून जा, असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले, असा आरोप महिलेच्या नातेवाईकाने सोशल मीडिया पोस्टमध्ये केला आहे. 

बोर्डिंग गेट बंद करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा प्रवाशांच्या नावाची घोषणा केली, पण महिला आणि दोन प्रवासी गेट बंद झाल्यानंतर आले होते, असे स्पष्टीकरण एअर इंडियाने दिले आहे. 

...तर आम्ही विमानाला उशीर करू शकत नाहीn    बोर्डिंग गेट बंद करण्यापूर्वी आमच्या कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा त्या तीन प्रवाशांच्या नावाची घोषणा केली, पण ते प्रवासी गेट बंद झाल्यानंतर आले होते. n    महिलेला जमिनीवर पडल्याचं बघताच लगेचच डॉक्टरांना बोलावण्यात आले, परंतु तोपर्यंत त्यांना बरे वाटू लागले आणि त्यांनी कोणतीही वैद्यकीय किंवा व्हीलचेअर मदत नाकारली. n    एअर इंडिया नेहमीच प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देते. तथापि, एक जबाबदार विमान कंपनी म्हणून, आम्ही नियामक प्राधिकरणांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागते आणि कोणत्याही परिस्थितीत, विशेषत: सर्व प्रवासी वेळेवर आले असतील तर आम्ही विमानाला उशीर करू शकत नाही.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया