शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

रुग्ण ओटीमध्ये होता, डॉक्टर कोंडीत अडकला, कार तशीच सोडून तीन किमी धावला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 10:35 IST

कार काही केल्या पुढे जात नव्हती. रुग्ण ओटीमध्ये होता, त्याला भूल देण्यात आली होती. पित्ताशयाच्या पिशवीची सर्जरी करायची होती.

बंगळुरू : डॉक्टर हा देवदूत असतो म्हणतात. परंतू, आज असे अनेक प्रकार घडतात ज्यामुळे डॉक्टरांबाबत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये डॉक्टरची प्रतिमा मलिन होऊ लागली आहे. पण, बंगळुरूमधील डॉक्टरने जे केले ते समजल्यावर तुम्ही त्या डॉक्टरचे आभार मानाल व देवासारखा धावून गेलाही म्हणाल. 

 डॉक्टर गोविंद नंदकुमार असे या डॉक्टरांचे नाव आहे. मणिपाल हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएंटरोलॉजी सर्जन डॉ. नंदकुमार हे ऑपरेशनसाठी जात होते. परंतू त्यांची कार सरजापुर-मराठाहळ्ळीच्या वाहतूक कोंडीत अडकली. कार काही केल्या पुढे जात नव्हती. रुग्ण ओटीमध्ये होता, त्याला भूल देण्यात आली होती. पित्ताशयाच्या पिशवीची सर्जरी करायची होती. अन्य रुग्ण देखील सर्जरीसाठी वाट पाहत होते, नंदकुमार यांची गाडी जिथे अडकली होती, तिथून मणिपाल हॉस्पिटल तीन किमीवर होते. यामुळे मागचापुढचा विचार न करता डॉक्टर गाडीतून उतरले, कार तिथेच सोडली आणि हॉस्पिटलकडे धाव घेतली. ही घटना ३० ऑगस्टची आहे.

नंदकुमार यांनी टाईम्स ऑफ इंडियाला माहिती देताना सांगितले की, “मला कनिंगहॅम रोडवरून सर्जापूरच्या मणिपाल हॉस्पिटलला पोहोचायचे होते. मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे हॉस्पिटलच्या आधी काही किलोमीटर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहतूक सुरळीत होत नसल्याचे दिसल्याने मी माझ्या कारमधून बाहेर पडलो 45 मिनिटे धावलो. जे रुग्ण शस्त्रक्रियेसाठी थांबले होते, ते सकाळपासून उपाशी होते. त्यांना शस्त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काही खाता येणार नव्हते. यामुळे मी त्यांना जास्त वेळ थांबवू शकत नव्हतो.''

डॉ. गोविंद नंदकुमार हे गेल्या १८ वर्षांपासून सेवा देतात. त्य़ांनी आतापर्यंत हजाराहून अधिक ऑपरेशन केली आहेत. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमधून ट्यूमर आणि खराब झालेले भाग काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांचे ते तज्ञ आहेत.

टॅग्स :doctorडॉक्टरBengaluruबेंगळूर